बोल्ड सीनवर राखीचा पती काय म्हणतोय…

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

राखीने रिेतेश नावाच्या एनआरआयशी लग्न केले असल्याचे सांगितले होते. मात्र त्याचा चेहरा अद्याप कोणीही पाहिलेला नाही. रितेशने नुकताच एका या बेवसाईटला मुलाखत देत लग्नाबाबत खुलासा केला आहे.

मुंबई ः सवंग प्रसिद्धी मिळवण्यासाठी काहीही करणारी अभिनेत्री म्हणून राखी सांवत फेमस आहे. मध्यंतरी राखीने गुपचूप लग्न उरकल्याची चर्चा सोशल मीडियावर होती मात्र, तिच्यावर काेणाचाच विश्वास नव्हता, मात्र तिच्या पतीनेच मुलाखत देत खुलासा केल्याने तिच्या लग्नावर शिक्कामाेर्तब झाले आहे.

दरम्यान, राखीने रिेतेश नावाच्या एनआरआयशी लग्न केले असल्याचे सांगितले होते. मात्र त्याचा चेहरा अद्याप कोणीही पाहिलेला नाही. रितेशने नुकताच एका या बेवसाईटला मुलाखत देत लग्नाबाबत खुलासा केला आहे.

रितेनशने दिलेल्या मुलाखतीमध्ये राखीशी केलेल्या लग्नाविषयी माहिती दिली आहे. ताे म्हणताे,‘राखीचे कॅमेरा समोरचे वागणे कसेही असो मला ती मनापासून आवडते. ती एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे. राखी सारखी पत्नी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशीबवान समजतो. राखी ही माझ्यासाठी देवाने दिलेली एक भेट आहे.’ 

रितेशला राखीच्या बोल्ड सीन्सबद्दलही विचारण्यात होते. ‘नुकताच राखीने माझ्याशी लग्न करत एका नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. पत्नीने चित्रपटांमध्ये बोल्ड सीन द्यावेत असे कोणत्या पतीला वाटेल. पण तिच्या कपड्यांवर माझा काही आक्षेप नाही. तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे’ असे रितेश पुढे म्हणाला.

दरम्यान, रितेशला मीडियापासून दूर राहण्याबाबत काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर रितेशने तो इतके दिवस मीडियापासून दूर का राहिला याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी मीडियासमोर का यावे? त्यातून काय साध्य होणार आहे का? उगाच नको त्या चर्चा सुरु होतील. मला माझे खाजगी आयुष्य मीडियासमोर मांडायला आवडत नाही. माझ्याबद्दल लोक काय विचार करतात त्याने मला काडीमात्र फरक पडत नाही. माझे कुटुंबीय आणि राखीचे कुटुंबीय खूप आनंदी आहेत. मी योग्य वेळ पाहून मीडियासमोर येईन.’ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakhi sawant husband speaks about wife bold scene