राखी सावंतचा 'स्पायडर वुमन' लूक

चेहऱ्यावर रंग लावून राखीने केलेल्या स्पायडर वुमन लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राखी सावंतचा 'स्पायडर वुमन' लूक

छोट्या पडद्यावरील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (rakhi sawant) तिच्या अतरंगी आणि हटके स्टाइलमुळे नेहमी चर्चेत असते. वेगवेगळ्या लूकमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस येऊन लोकांचे मनोरंजन करते. नुकताच तिने चक्क स्पायडर वुमनचा लूक केला होता.

राखी स्पायडर वुमनचा लूक करून घराबाहेर पडली होती. तेव्हा तिला अनेक फोटोग्राफर्सने घेरले. चेहऱ्यावर रंग लावून राखीने केलेल्या स्पायडर वुमनच्या लूकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राखी म्हणत आहे की , 'मला बिग बॉस ओटीटीमध्ये जायचे आहे. बिग बॉस मला आत्ता बोलवा. तुम्ही मला वचन दिले होते.' राखीचा या लूकमधील व्हिडीओला अली गोनीने कमेंट केली, 'बात खतम' तिच्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे.

राखीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ती म्हणाली, 'मी बिग बॉस ओटीटीवर खूप नाराज आहे. बिग बॉसने या सिझनमध्ये सिदार्थ शुक्ला आणि शेहनाजला घेतले, पण मला नाही बोलावले. असे होऊ शकत नाही. मी बिग बॉसमध्ये येत आहे. करण जोहर या सिझनमध्ये धमाका करत आहेत. तो स्पर्धकांना खूप ओरडत आहे. मला बिग बॉसच्या घरात जाऊन सर्वांना शांत करायचे आहे. मला बिग बॉसच्या घरात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही. '

बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये राखीने भाग घेतला होता. या सिझनमध्ये राखी फायनलिस्ट होती. राखीसोबतच अली गोनी, निक्की तंबोळी, रूबिना दिलैक आणि राहूल वैद्य हे स्पर्धक फायनलमध्ये होते. राखी या सिझनमधून 14 लाख रूपये घेऊन बाहेर पडली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com