'देश की गद्दार है कंगना दीदी'; राखीच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचाच! Rakhi Sawant | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant and Kangana Ranaut

'देश की गद्दार है कंगना दीदी'; राखीच्या व्हिडीओवरील नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया वाचाच!

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'ड्रामा क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत Rakhi Sawant सध्या सोशल मीडियावर तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओद्वारे तिने अभिनेत्री कंगना राणावतवर Kangana Ranaut निशाणा साधला आहे. देशाच्या स्वातंत्र्याबाबत कंगनाच्या वादग्रस्त विधानाचा राखीने निषेध केला आहे. 'देश की गद्दार है दीदी', असं म्हणत तिने कंगनाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे कंगनाच्या व्हिडीओमधील आवाज तिने एडीट केला असून त्या जागी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज दिला आहे. राखीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.

'टाइम्स नाऊ समिट'मध्ये कंगनाने देशाच्या स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. '१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे भीक होतं, खरं स्वातंत्र्य तर २०१४ मध्ये मिळालं', असं ती म्हणाली होती. तिचा हाच व्हिडीओ एडीट करून राखीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला.

हेही वाचा: अतुल कुलकर्णीचा मोजक्या शब्दांत विक्रम गोखलेंना टोला?

कंगनावर टीका केल्याने राखीच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'आजपासून तूच आमची नॅशनल क्रश' अशी भन्नाट कमेंटने नेटकऱ्याने केली आहे. तर 'राखी तुझा आम्ही आदर करतो', असं दुसऱ्याने लिहिलं. कमेंट्समध्ये कंगनाच्या चाहत्यांनी राखीवर टीका केली आहे.

राखी सावंतने रविवारी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यामध्ये ती रुग्णालयात दाखल झाल्याचं पहायला मिळतंय. रुग्णालयातील बेडवर ती झोपली असून नर्स तिच्यावर उपचार करत असल्याचं दिसतंय. "मला खूप मोठा धक्का बसला आहे. आपल्या देशाला २०१४ मध्ये खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं काहीजण बोलत आहेत. अशा लोकांना उत्तर दिलंच पाहिजे. मी माझं काम केलं", असं ती या व्हिडीओत म्हणते.

loading image
go to top