बिग बॉस १४: सलमान खानच्या विकेंडच्या वारमध्ये राखी सावंत आणि कश्मिरा शाह एकमेकींना भिडल्या

दिपाली राणे-म्हात्रे
Sunday, 6 December 2020

शोमध्ये आता राखी सावंत, कश्मिरा शाह, राहुल महाजन, विकास गुप्ता हे चार नवीन सदस्य पोहोचले आहेत. हे सगळे आपापल्या सिझनचे सगळ्यात प्रसिद्ध चेहरे आहेत. 

मुंबई- छोट्या पडद्यावरील सगळ्यात वादग्रस्त रिऍलिटी शो म्हणजे 'बिग बॉस'. 'बिग बॉस'च्या यंदाच्या १४ व्या सिझनमध्ये सध्या फिनालेची तयारी सुरु आहे. यावेळी शोच्या निर्मात्यांनी उरलेल्या सदस्यांच्या अडचणीत आणखी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी घरातील सदस्यांना 'बिग बॉस'चे सगळ्यात जास्त चर्चेत असलेले माजी स्पर्धक चॅलेंज देण्यासाठी पोहोचले आहेत. ज्यामधील काही जणांची झलक आता समोर आली आहे. शोमध्ये आता राखी सावंत, कश्मिरा शाह, राहुल महाजन, विकास गुप्ता हे चार नवीन सदस्य पोहोचले आहेत. हे सगळे आपापल्या सिझनचे सगळ्यात प्रसिद्ध चेहरे आहेत. 

हे ही  वाचा: 'स्वतःला वाघिण म्हणवतेस पण...' मिक्का सिंगने लगावला कंगनाला टोला  

सलमानच्या यंदाच्या विकेंडच्या वारची झलक समोर आली आहे. यावेळी सलमान खान सगळ्या चॅलेंजर्सची ओळख करुन देत आहे. सगळ्यात आधी विकास गुप्ता, त्यानंतर राखी सावंत राहुल महाजनसोबत एंट्री घेते. मात्र राखीला आश्चर्याचा धक्का बसतो जेव्हा तिला कळतं की कश्मिरा शाह देखील 'बिग बॉस'मध्ये येणार आहे. राखी निर्मात्यांवर नाराजी व्यक्त करते. इतकंच नाही तर कश्मिरा शाह देखील निर्मात्यांना सवाल करत विचारते की राखीला निर्मात्यांनी कसं काय येऊ दिलं?  तर दुसरीकडे हे सगळं पाहून सलमानला हसू आवरत नाही.

'बिग बॉस १४' फिनालेबाबत बोलायचं झालं तर अभिनव शुक्ला आणि एजाज खान आधीच फायनलमध्ये पोहोचले आहेत. अशात आता राहुल वैद्य, निक्की तंबोली, जॅस्मिन भसीन आणि रुबीना दिलैक यांच्यामध्ये फायनलसाठी रस्सीखेच होताना दिसणार आहे. 'बिग बॉस' होस्ट करणा-या सलमान खानने एक आठवड्यापूर्वीच घोषणा केली होती की 'बिग बॉस १४' च्या फिनालेमध्ये केवळ ४ जणांची एंट्री होणार आहे. तेव्हा आता हे चॅलेंजर्स काय घरातील सदस्यांचा कसा गोंधळ उडवणार आहेत हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.  

rakhi sawant kashmera shah vikas gupta rahul mahajan new challenge contestant bb finale  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rakhi sawant kashmera shah vikas gupta rahul mahajan new challenge contestant bb finale