पाऊस आला रे आला, राखीचा आनंद गगनात मावेना...

जेव्हा पाऊस आला तेव्हा राखी एक पोज देत म्हणते...
actress rakhi sawant
actress rakhi sawant Team esakal

मुंबई - बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन (bollywood drama queen) म्हणून राखीची ओळख आहे. गेल्या बिग बॉसच्या सीझनमध्ये (bigg boss) सर्वाधिक लोकप्रिय स्पर्धक म्हणून राखीनं चाहत्यांची वाहवा मिळवली होती. त्यानंतर तिनं वेगवेगळ्या प्रकारची वादग्रस्त वक्तव्य करुन प्रेक्षकांचे मनोरंजनही (entertainment) केले होते. काही दिवसांपूर्वी राखीनं बाबा रामदेव (baba ramdev) यांच्या अॅलोपॅथीच्या वक्तव्यावर कमेंट केली होती. त्या कमेंटलाही राखीच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. आता राखी तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. (rakhi sawant latest crazy video dancing in the rain paani paani badshah song)

विरल बियानीनं (viral biyani) इंस्टावरुन राखीचा तो व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती पावसाचा आनंद घेताना दिसत आहे. पाऊस आल्याचा राखीला इतका आनंद झाला आहे. की त्यामुळे तिनं रस्त्यात डान्स करायला सुरुवात केलीयं. क्रेझी राखी अशाप्रकारच्या कमेंटही तिला त्यामुळे मिळाल्या आहेत. अशाप्रकारे लोकप्रियता मिळवणे ही राखीची वेगळी ओळख आहे. सेलिब्रेटींवर गंमतीशीर कमेंट करुन त्यांच्यावर टीका करत राखीनं सेलिब्रेटी म्हणून नवी ओळख तयार केली आहे.

जेव्हा पाऊस आला तेव्हा राखी एक पोज देत म्हणते आता मी कुठे जाऊ, त्यावेळी फोटोग्राफर्सनं तिला काही प्रश्न विचारले होते. त्यालाही राखीनं बिनधास्तपणे उत्तरं दिल्याचे दिसून आले आहे. त्यावेळी तिनं बादशाहचे पानी पानी नावाचे गाणे गायला सुरुवात केली होती. हा व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर झाला आहे. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

actress rakhi sawant
पवित्र रिश्ता २: अंकितासोबत मानवची भूमिका साकारणार 'हा' लोकप्रिय अभिनेता

राखीच्या त्या व्हिडिओला शेकडो लाईक्स आणि कमेंटस् मिळाल्या आहेत. त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तिला कमेंटही आल्या आहेत. अनेकांनी राखीच्या त्या हटकेपणाचे कौतूकही केले आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे, इंटरटेनमेंट, इंटरटेनमेंट, तर दुस-या युझर्सनं राखी दररोज जाते कुठे असा प्रश्न विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com