राखी सावंत होणार स्मृती इराणी २.०, हेमामालिनीच्या 'त्या' वक्तव्यानंतर केलं जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rakhi Sawant

Video : राखी सावंत होणार स्मृती इराणी २.०, हेमामालिनीच्या 'त्या' वक्तव्यानंतर केलं जाहीर

Rakhi On Hema Malini : राखी सावंत तिच्या स्पष्टवक्ते आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिच्या निशाणाऱ्यावर भाजप खासदार हेमा मालिनी आहेत. काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी एका विधानात राखी सावंतचे नाव घेतले होते. त्यानंतर आता राखीने एक व्हिडिओ शेअर करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात तिने स्वतःला स्मृति इरानी 2 असे संबोधले आहे.

राखीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हेमा मालिनी यांच्या वक्तव्यावर खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे. खरं तर, मे 2022 मधील निवडणूका लढवणार आहे. ही गोष्ट सिक्रेट होती. ही घोषणा देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि अमित शाहा करणार होते. मात्र, माझं भाग्य की माझी ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांनी हे जाहीर केले की यावेळची निवडणूक मी म्हणजेच राखी लढवणार आहे.

हेही वाचा: Accident : पाकिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले; दोन मेजरसह सहा जवान ठार

राखीने व्हिडिओमध्ये पुढे म्हटले आहे की, "खरं तर पीएम मोदी आणि अमित शहा यांनी माझ्याबद्दल बोलायला हवे होते पण, असू दे पीएम मोदी किंवा हेमा मालिनींनी दाहीर करणे ही एकसारखीच गोष्ट असून, आता मी स्मृती इराणींचा भाग 2 बनणार आहे. मी निवडणूक लढवणार आहे याचा मला खूप आनंद असून, कृपया मला पाठिंबा द्या असे म्हणत हेमा मालिनींनी माझ्याबद्दल जे छान विधान केले आहे. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. "

राखीने यापूर्वीदेखील लोकसभा निवडणूक लढवली आहे. 2014 मध्ये तिने मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून तिचाच पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय अपना दलातर्फे निवडणूक लढवली होती. यात तिला 9 लाख मतांपैकी केवळ 2000 मते मिळवता आली होती. या पराभवानंतर ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटामध्ये सहभागी झाली.

हेही वाचा: Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 200 कोटींच्या प्रकरणात जामीन मंजूर

हेमा मालिनी काय म्हणाल्या होत्या

हेमा मालिनी काल त्यांच्या लोकसभा मतदारसंघ मथुरेत होत्या. अभिनेत्री कंगना रणौत मथुरा मतदारसंघातून निवडणुकीला उभी राहणार असल्याविषयी विचारण्यात आलं. यंदा मथुरेतली भाजपाची उमेदवार कंगना रणौत असेल का याविषयी हेमा मालिनी यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या, "खूप चांगली गोष्ट आहे. माझा निर्णय देवावर अवलंबून आहे. जर दुसरं कोणी मथुरेतून खासदार होणार असेल, तर तुम्ही त्याला होऊ देणार नाही. तुम्हाला मथुरेतून फिल्मस्टारच हवा आहे. राखी सावंतला पाठवाल, तर तीही इकडून खासदार होईल."

कंगना रणौत २०२४ ची निवडणूक मथुरेतून लढवणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहे. गेल्या वर्षभरात कंगना दोनवेळा या भागात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ती आपल्या कुटुंबासोबतही वृंदावन इथं आली होती. तर दुसरीकडे हेमा मालिनी मथुरेतून भाजपाच्या तिकीटावर दोन वेळा निवडून आल्या आहेत.