Rakhi Sawant: 'माझा जीव घ्या पण माझ्या भावाला..', सलमानसाठी राखी जीव देण्यासही तयार! बिश्नोई गँगला थेट...

salman khan and rakhi sawant
salman khan and rakhi sawantEsakal

राखी सावंत हे बॉलिवूडमधलं असं नाव आहे जे काही न करताही चर्चेत असतं. तिचे व्हिडिओ हे सोशल मिडियावर व्हायरल होतात. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी तिला चांगलच ट्रोल करतात. तरीही त्याचा राखीवर काहीच परिणाम होत नाही. आताच तिने सलमानचा चित्रपट किसी का भाई किसी की जान पाहिला आणि त्यानंतर ती थिएटरमध्ये नाचतांना दिसली होती.

salman khan and rakhi sawant
Salman Khan: गल्ला भरला! 'किसी का भाई किसी की जान'च्या यशानंतर सलमानची खास पोस्ट; म्हणाला..

काही दिवसांपुर्वी राखीला लॉरेंस बिष्णोई गॅंगकडून जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर राखीचे धाबे दणणाले होते. ती तोंड लपवत इकडे तिकडे फिरतांना दिसली होती.

राखीनं यासंबंधी राखीशी मीडियाला सांगितलं होत की सलमान खानच्या प्रकरणात ती जर बोलली तर आम्ही तुला मारुन टाकू. कारण काही दिवसांपुर्वी राखीने लॉरेंस बिष्णोई गँगला सलमानला माफ करा असं सांगितलं होत.

salman khan and rakhi sawant
Amitabh Bachchan Tweet: 'खेल खतम, पैसा हजम?!', अमिताभ इलॉन मस्कवर पुन्हा भडकले.. अलाहाबादी शैलीतच झापलं

दरम्यान आता पुन्हा राखी या प्रकरणावर बोलली आहे. मात्र यावेळी ती खुपच बिनधास्त दिसली.

ज्यावेळी 'इन्स्टंट बॉलिवूड' या मनोरंजन पोर्टलच्या वतीने राखी सावंतला विचारण्यात आले की, सलमान खानसोबत तिलाही धमक्या येत आहेत, त्यामुळे ती घाबरली नाही का?

यावर राखी म्हणाली की, 'आज ईदच्या दिवशी स्पष्टपणे बोलत आहे. माझ्या भावाला हात लावू नका. भावाच्या बहिणीच्या हत्येने तुमचं पोट भरले, तुम्हाला शांती मिळेल तर नक्कीच मी सलमान खानची बहीण राखी सावंत आहे. माझा जीव घ्या .. दिला मी आणि माझा हत्येचा गुन्हाही तुमच्या डोक्यावर येणार नाही. जा.. अल्लाह-हू-अकबर.'

जेव्हा राखीला विचारण्यात आलं की ही धमकी आल्यानंतर ती सलमान खानशी योबद्दल बोलली होती का यावर तिने सांगितलं की, तिच्यात आणि सलमानमध्ये या विषयावर गुप्तपणे संवाद झाला आहे ती यावर काहीही बोलू शकत नाही. तिचं आणि सलमानच्या फॅमिलीचं नात खुप घट्ट आहे.

salman khan and rakhi sawant
Badshah Apologise: अखेर बादशहा झुकलाच! भोलेनाथच्या भक्तांनी 'सनक' उतरवली...

राखी ही तिच्या ड्रामासाठी ओळखली जाते. ती नेहमी काहीतरी वेगळ करण्याच्या नादात लोकांच मनोरंजन करत असते. गेल्या काही काळापुर्वी ती तिचा पती आदिल यांच्यामुळे चर्चेत होती. तिने आदिलवर अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. त्याने तिची फसवणुक केली असून तिला मारहान देखील केली असं राखीचं म्हणनं आहे. इतकच नाही तर आदिल सोबत लग्न करण्यासाठी राखीनं मुस्लिम धर्म देखील स्विकारला असून तिनं तिचं नाव फातिमा ठेवलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com