Badshah Apologise: अखेर बादशहा झुकलाच! भोलेनाथच्या भक्तांनी 'सनक' उतरवली...

Badshah Apologise
Badshah ApologiseEsakal

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर आणि सिंगर बादशाह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नवीन गाण्यावरुन चर्चेत आहे. त्याचा सनक हा अल्बम काही दिवसांपुर्वीच रिलिज झाला. याला तरुणांचा चांगला प्रतिसादही मिळाला मात्र या गाण्यात अत्यंत अश्लील शब्दांचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.

या गाण्यात भोलनाथच्या नावाचा वापर करण्यात आला आणि त्यामुळे शिवभक्ताच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. या गाण्याला लोक तीव्र विरोध करु लागले. इतकच नाही तर शिवभक्तांनी प्रसिद्ध रॅपरवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा आहे.

Badshah Apologise
Nana Patekar: नाना पाटेकरांना सुद्धा मुंबई इंडियन्सची भुरळ... मॅच पाहण्यासाठी थेट वानखेडेवर

दरम्यान इंदूर येथाल 'परशुराम सेना' या संघटनेने गायक बादशाह यांच्यावर एका नवीन गाण्यात 'भोलेनाथ' हा शब्द वापरल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला करत त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे

Badshah Apologise
Sachin Tendulkar Birthday: सचिनला अंजली वाहिनी कशा भेटल्या? क्रिकेटच्या बादशहाची फिल्मी लव्हस्टोरी..

'सनक' गाण्यावरून वाढता वाद पाहून बादशाहाने आता माघार घेतली आहे. त्याने सोशल मीडियावर एका लांबलचक पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे. त्याचबरोबर गाण्यात बदल करताना जुन्या गाण्यातुन ते शब्द काढून टाकणार असल्याचं सांगितले.

Badshah Apologise
Amitabh Bachchan Tweet: 'खेल खतम, पैसा हजम?!', अमिताभ इलॉन मस्कवर पुन्हा भडकले.. अलाहाबादी शैलीतच झापलं

बादशाहने इंस्टाग्रामवर पोस्ट केले की, “माझ्या हे लक्षात आले आहे की माझ्या नुकत्याच रिलीज झालेल्या सनक गाण्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. जाणूनबुजून किंवा चुकूनही कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतु नाही.'

पुढे त्याने लिहिलं आहे की, मी माझी कलात्मक रचना तुमच्या सर्वांसमोर अतिशय उत्कटतेने सादर करत आहे. नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर, मी एक ठोस पाऊल उचलले आहे आणि माझ्या गाण्याचे काही भाग बदलले आहेत आणि सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवर जुने गाणे नवीन गाण्याने बदलले आहे जेणेकरून इतर कोणाच्याही भावनी दुखाल्या जाणार नाहीत.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com