
Rakhi Sawant ने नमाज पढताना शेअर केला व्हिडीओ..100 चूका दाखवत लोक म्हणू लागले..
Rakhi Sawant Video: आदिल खान दुर्रानीला डेट केल्यानंतर राखी सावंतनं त्याच्याशी लग्न देखील केलं. मे २०२२ मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज आणि जानेवारी २०२३ मध्ये या लग्नाचा खुलासा केला पण यानंतर जे झालं ते लपून राहिलं नाही.
राखीनं बॅक टू बॅक आपल्या पतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. आणि याचा परिणाम म्हणजे आज आदिल तुरुंगात आहे हे आपल्या सगळ्यांना माहितच आहे.
तर तिकडे राखी अजूनही शांत बसायचं नाव घेईना. ती सतत आदिलवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. कधी त्याच्यासोबतच्या आपल्या जुन्या आठवणी ती ताज्या करताना दिसत आहे तर कधी त्याला कोसताना दिसत आहे. आता एक व्हिडीओ तिनं पुन्हा शेअर केला आहे,ज्यात ती नमाज पढताना दिसत आहे.
राखी सावंतनं सांगितलं होतं की आदिल खान दुर्रानीशी लग्न झाल्यानंतर तिनं धर्मांतरण केलं होतं. आणि आपलं नाव फातिमा ठेवलं होतं. तिनं हिजाब परिधान केल्याचंही आपण अनेकदा पाहिलं असेल.
नुकत्याच शेअर झालेल्या व्हिडीओत ती हिजाब परिधान करून नमाज पढताना दिसत आहे. क्लिप शेअर करत राखी सावंतने लिहिलं आहे की-''आदिल तू हे काय केलंस माझ्यासोबत..'',.तिनं रेड हार्ट इमोजी अन् सोबत सॅड इमोजी देखील पोस्ट केला आहे. आणि अर्थात तिनं आपल्या मनातल्या भावना देखील बोलून दाखवल्यात.
आता ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर यावरील लोकांच्या प्रतिक्रिया अधिक चर्चेत आल्या आहेत.
एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे-'नेलपेंट लावून नमाज ...तू नमाज पढतान दिसतेयस खरंच ही चांगली गोष्ट आहे पण याची एक योग्य पद्धत आहे..त्या पद्धतीनं केलंस तर ती अधिक फळेल तुला'.
तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की-'नेल पेंट लावून कुणी नमाज पढतं का?.. देवासाठी करतेयस नीट कर जरा. नेल पेंट लावून नमाज नाही पढत'.
तर आणखी एकानं लिहिलं आहे की-'अगं राखी स्पष्ट दिसत आहे तू दिखावा करतेयस. कृपया तुमच्या भांडणात धर्माला आणू नकोस. धर्माची इज्जत करायला शिक'.