Rakhi Sawant : राखीचा अटकपूर्व जामीन फेटाळला! प्रायव्हेट व्हिडिओ शेयर प्रकरण अंगाशी येणार?

टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
Rakhi sawant pre arrest bail plea rejected
Rakhi sawant pre arrest bail plea rejectedesakal

Rakhi sawant pre arrest bail plea rejected : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. कोर्टानं आता राखीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून तिला ते प्रायव्हेट व्हिडिओ प्रकरण डोकेदुखीचं ठरणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

आदिल दुर्रानी मार्फत राखीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात राखीनं आदिलचा तो प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल केला होता. या प्रकरणात मुंबई सेशन कोर्टानं राखीला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे राखीला आता कोणत्याही क्षणी अटक होणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. भारतीय दंड संहिता आणि सुचना प्रोद्योगिकी अधिनयमद्वारे मानहानी करणे बाबत राखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ ऑगस्ट २०२३ मध्ये राखीनं आदिलचे ते प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल केले होते. राखीनं तिच्या अटकपूर्व जामीनमध्ये म्हटले होते की, आपल्या विरोधात कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही. या उलट आपल्याला मोठ्या मानसिक आणि शाररिक त्रासाला सामोरं जावे लागत आहे. त्यामुळे आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे अशी मागणी केली होती.

या उलट विरोधीपक्षाकडून सांगण्यात आले की, आम्ही राखीकडून करण्यात आलेल्या दाव्याचे खंडन करतो. तिनं व्हाट्स अपवर शेयर केलेले व्हिडिओ हेच सर्वात मोठे कारण आहे. त्यावेळी कोर्टानं राखीच्या विरोधातील युक्तिवादाकडे लक्ष वेधत तपास यंत्रणेला अद्याप ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त केले गेले नाही असे म्हटले आहे.

राखीच्या वकिलानं काय सांगितलं...

आदिलच्या एका रिपोर्टनुसार, राखीनं तो व्हिडिओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यामध्ये काही इंटिमेट व्हिडिओ देखील होते. तो व्हिडिओ २५ ते ३० मिनिटांचा होता. त्यावर राखीच्या वकिलांचे म्हणणे आहे की. सेक्शन ६७ अ नुसार आदिलही तितकाच दोषी आहे. कारण त्यानं ते व्हिडिओ रेकॉर्ड केले.

राखीला गेल्या वर्षी २९ नोव्हेंबर रोजी अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर कोर्टानं राखीला पुन्हा अटकेपासून संरक्षणसाठी वेळ देत उच्च न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी ११ जानेवारी २०२४ पर्यत वेळ दिला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com