Adil Khan On Rakhi Sawant Allegation: राखीच्या नवऱ्याची अखेर तूरुंगातुन सुटका! बाहेर येताच म्हणाला, 'आता तिला सोडणार नाय'

Adil Khan On Rakhi Sawant Allegation:
Adil Khan On Rakhi Sawant Allegation: Esakal

Rakhi Sawant Husband Adil Khan: बॉलिवूडमधली ड्रामा क्विन राखी सावंत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपुर्वी ती तिचा एक्स पती आदिल दुर्रानी याच्यामुळे चर्चेत होती.

आदिल गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात होता. आता आदिल खान दुर्रानी तब्बल 6 महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आला. आता बाहेर येताच आदिल राखीच्या मागे लागला आहे. राखीनं बरचं काही खोट सांगितलं आहे आता मी तुम्हाला खरी कहानी सांगेल असं तो म्हणाला.

काही दिवसांपुर्वी राखीने अचानक लग्नाची घोषणा करत सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर दोघांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा झाली. पण, लग्नानंतर काही दिवसांनीच दोघांमध्ये मतभेद झाले आणि त्यानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप लावले. त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर आदिलाला तुरुंगात टाकण्यात आले.

Adil Khan On Rakhi Sawant Allegation:
Ashok Saraf: प्रेक्षकांचे लाडके अशोक सराफ यांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवारांची महत्वाची घोषणा

राखी सावंतने 6 फेब्रुवारी 2023 रोजी आदिलविरोधात फसवणूक, घरगुती हिंसाचार आणि दागिन्यांची चोरी असे अनेक गंभीर आरोप करत गुन्हा दाखल केला होता. इतकच नाही तर म्हैसूरमधील एका महिलेनेही आदिलवर छेडछाडीचा आरोप केला होता. आता जवळपास 6 महिने तुरुंगात राहिल्यानंतर आदिल बाहेर आला आहे. बाहेर येताच मीडियाने त्याला घेरले आणि अनेक प्रश्न विचारली.

(Latest Marathi News)

Adil Khan On Rakhi Sawant Allegation:
Salman Khan New Look: सलमान खानचा 'गजनी' लूक व्हायरल! नेटकरी म्हणाले, 'तेरे नाम चा सिक्वेल की..'

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर जेव्हा पापाराझीने आदिलला राखी सावंतच्या आरोपांबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी आदिल म्हणाला की, 'मी लवकरच या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे.'

Adil Khan On Rakhi Sawant Allegation:
Sunny Deol's Juhu Bungalow: सनी देओलला बँकेचा दिलासा! बंगल्याच्या लिलावाला स्थगिती, हे आहे कारण

आता आदिल खान तुरुंगातून बाहेर आला आहे. मीडियाच्या प्रश्नांवर तो म्हणाला की, आता मी लवकरच राखी आणि तिच्यासोबत असलेल्या सर्व लोकांना उघड करणार आहे. माझ्यासोबत चुकिच झालं आहे, बऱ्याच दिवसांनी मी तुरुंगातून बाहेर आलो आहे. आज ना उद्या मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. मी माझी संपूर्ण कहाणी लोकांसमोर आणणार आहे. '

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकरी आदिलला पाठिंबा देतांना दिसत आहे. आता राखी या सर्व प्रकरणावर काय प्रतिक्रिया देते याकडे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com