चौकशी संपताच रकुलची माध्यमांच्या विरोधात न्यायालयात धाव

युगंधर ताजणे
Sunday, 27 September 2020

आपल्याशी संबधित तसेच ज्यात ड्रग्जचा संदर्भ येईल त्याबद्दल कुठल्याही स्वरुपाची माहिती,लेख माध्यमांनी देऊ नयेत अशा सुचना तातडीने न्यायालयाने माध्यमांना द्याव्यात ही विनंती रकुलने केली आहे. सुरुवातीला आपले नाव सुशांतची गर्लफ्रेंड म्हणुन घेतले गेल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली आहे.  

मुंबई - सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात चौकशीसाठी बाँलीवुडच्या अभिनेत्यांना एनसीबीने बोलावले आहे. यासगळ्या घटनांचे वार्तांकन प्रसारमाध्यमे तितक्याच वेगाने वाचक, प्रेक्षक यांच्यापर्यत पोहचवत आहे. अनेक कलावंतांना तपासकामात होत असलेला हस्तक्षेप खटकताना दिसत आहे. यावरुन सतत वाढत असणारा हस्तक्षेपावर कलावंत आक्षेप घेत आहे. 

सुशांत केसचा तपास अनेक घटना, संदर्भ यामुळे भलताच चर्चेत आला आहे. त्यात बाँलीवुडच्या कलाकारांचा असणारा सहभाग ड्रग्जच्या प्रकरणावरुन पुढे येत आहे.आतापर्यत १४ जणांना एनसीबीकडुन नोटीस पाठविण्यात आली आहे. आतापर्यत १४ जणांना एनसीबीकडुन समन्स पाठविण्यात आले आहे. यात दिपिका पदुकोण, सारा अली खान, रेहा चक्रवर्ती, सँम्युएल मिरांडा, जया साहा, दिया मिर्झा, करिश्मा प्रकाश, रकुल प्रित सिंग, श्रध्दा कपुर, शोविक चँटर्जी, श्रृती मोदी, दीपेश सावंत, सिमोन खंबाटा आणि ध्रुव चितगोपेकर यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. यापुढील काळात आणखी ५० कलाकारांची नावे एनसीबीकडे तयार असल्याचे सांगण्यात आले आहे.

दीपिकाची चौकशी साडेपाच तासानंतर संपली; 'माल' म्हणजे काय? दीपिकाचा NCB समोर खुलासा

एनसीबीला सुशांतच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही ड्रग चँट मिळाले. तिथुन या घटनेला वेगळा रंग येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रेहा चक्रवर्ती हिला एनसीबीने अटक केली. पुढे तिचा भाऊ शौविक याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. अद्याप रेहाची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. प्रसारमाध्यमांच्या विरोधात रकुल प्रीत सिंग हिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यात तिने न्यायालयाकडे आपल्या बाबत वृत्तवाहिन्या, वृत्तपञ यात जे प्रसारित केले जात आहे ते करण्यात येऊ नये असे म्हटले आहे. याबाबतची माहिती देणारे एक वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. सध्या माध्यमामध्ये सुशांतच्या केस संदर्भात होणा-या वार्ताकनाबाबत रकुलने नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - प्रश्नांची सरबत्ती झाली, दीपिकाला आले रडू

एनसीबीचा तपास, कलाकारांची होणारी चौकशी यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळे वळण लागले आहे. १४ जुन रोजी आपल्या घरी सुशांतने आत्महत्या केली. यानंतर २५ सप्टेंबर रोजी  रकुलला एनसीबीकडुन नोटीस पाठवण्यात आली. दरम्यानच्या काळात प्रसारमाध्यमांतुन या घटनेचे वार्तांकन सुरु होते. माञ ते ज्या पध्दतीने केले जात आहे त्याला रकुलने विरोध केला आहे. आपल्याशी संबधित तसेच ज्यात ड्रग्जचा संदर्भ येईल त्याबद्दल कुठल्याही स्वरुपाची माहिती,लेख माध्यमांनी देऊ नयेत अशा सुचना तातडीने न्यायालयाने माध्यमांना द्याव्यात ही विनंती रकुलने केली आहे. सुरुवातीला आपले नाव सुशांतची गर्लफ्रेंड म्हणुन घेतले गेल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली आहे.

आता सध्या एनसीबीच्या मुंबई विभागाकडून अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी अंमलीपदार्थांचा संबंध आहे का, याबाबत तपास सुरू आहे. यामुळे त्याच्याशी संबंधित बाँलीवुडमधील कलाकारांना चौकशीसाठी समन्स पाठवले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rakul Preet Singh moves Delhi HC with a plea against media coverage