Ram Charan: राम चरण पत्नी उपासनासोबत पोहोचला मालदीवला... व्हेकेशन फोटो व्हायरल

राम चरणने पत्नी उपासनासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
ram charan and upasana
ram charan and upasana Sakal

साऊथचा अभिनेता राम चरण सध्या त्याची पत्नी उपासना कामिनेनीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करत आहे. त्याने सोमवारी सुट्टीचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघेही मालदीवमध्ये असल्याचे बोलले जात आहे. लवकरच होणार्‍या पालकांनी यापूर्वी दुबईमध्ये बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते, ज्यात कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

राम चरणने पत्नी उपासना कामिनेनीसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पहिल्या फोटोमध्ये उपासना त्याच्या मागे बसलेली दिसत आहे. दोघेही बोटीमध्ये आहेत आणि समुद्राच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत.

पुढील फोटोत फक्त राम चरण दिसत आहे. फोटोच्या बॅकग्राउंडवरून त्याने क्वालिटी टाइम स्पेंड करण्यासाठी बीचसाइड रिसॉर्ट बुक केल्याचे समजते. हे फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ब्लू हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. ही पोस्ट उपासनाने तिच्या इन्स्टा स्टोरीजवर शेअर केली आहे.

ram charan and upasana
Raveena Tandon: रवीना टंडनला अगोदर आली होती 'छैय्या छैय्या' गाण्याची ऑफर, या कारणामुळे दिला नकार

यापूर्वी राम चरण आणि उपासना यांनी दुबईमध्ये बेबी शॉवर पार्टी दिली होती. उपासनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये पार्टीची संपूर्ण झलक होती. या पार्टीत खूप धमाल झाली.

उपासना आणि राम चरण यांनी गेल्या वर्षी त्यांच्या लग्नाचा 10 वा वाढदिवस साजरा केला. डिसेंबर 2022 मध्ये, राम चरणचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांनी सोशल मीडियावर उपासनाच्या गरोदरपणाची घोषणा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com