Ram Charan Video: तब्बल ४१ दिवस अनवाणी राहिलेल्या राम चरणने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन, जाणून घ्या कारण

Ram Charan Video
Ram Charan barefoot in black ethnic visits Siddhivinayak Temple with Shiv Sena leader Rrahul Kanal
Ram Charan Video Ram Charan barefoot in black ethnic visits Siddhivinayak Temple with Shiv Sena leader Rrahul Kanal eSAKAL

Ram Charan At Siddhivinayak Temple : साऊथचा सुपरस्टार राम चरण हा अनेकदा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याने आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटाच्या यशानंतर राम चरण जगभर प्रसिद्ध झाला आहे.

या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. त्यातच तो त्याच्या एअरपोर्ट लूकमुळे देखील चर्चेत आला होता. आता राम चरणने सिद्धिविनायक मंदिराला भेट देत बाप्पाचे दर्शन घेतले आहे. यावेळी त्याच्यासोबत शिवसेना नेते राहुल कनाल देखील होते.

Ram Charan Video
Ram Charan barefoot in black ethnic visits Siddhivinayak Temple with Shiv Sena leader Rrahul Kanal
Chahat Pandey: राजकारणासाठी अभिनय क्षेत्र सोडणार का चाहत? 'या' पक्षाकडून लढवणार निवडणूक!

तो काळा कुर्ता-पायजमा घालून अनवाणी चालत असताना मंगळवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसला होता. त्यानंतर त्याने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मात्र त्याला पाहण्यासाठी मंदिराबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याच्या 41 दिवसांच्या अयप्पा दीक्षेची सांगता झाली. असे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

मंगळवारी देखील राम चरणला हैदराबाद विमानतळावर स्पॉट केले होते. यावेळी त्याने कपाळावर टिळा लावला होता आणि काळा कुर्ता-पायजमा घालून तो देसी लूकमध्ये दिसला. यावेळी राम चरण अनवाणी पायांनी चालतांना दिसला. त्याने पायात चप्पल किंवा शूज काहीही घातलेलं नव्हतं.

Ram Charan Video
Ram Charan barefoot in black ethnic visits Siddhivinayak Temple with Shiv Sena leader Rrahul Kanal
Shweta Tiwari Birthday : ट्रॅव्हल एजन्सीत काम ते टीव्हीची राणी; असा आहे श्वेताचा प्रवास

राम चरण 41 दिवसांचा कडक उपवास करत आहेत. तो दरवर्षी अय्यप्पाची दीक्षा घेतो. दक्षिण भारतात अयप्पा दीक्षा नावाची परंपरा आहे. जी 41 दिवस चालते, जेथे भगवान अय्यप्पाचे भक्त तीन महीने विलासी जीवनशैलीपासून दूर राहतात आणि सात्त्विक जीवन जगतात. या काळात ते 41 दिवस काळे वस्त्र परिधान करतात.

Ram Charan Video
Ram Charan barefoot in black ethnic visits Siddhivinayak Temple with Shiv Sena leader Rrahul Kanal
Rochelle Rao Baby: "जे मागितलं ते परमेश्वराने दिलं.." 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीच्या घरी आली लक्ष्मी!

याकाळात ते मांसाहार करू शकत नाही, दाढी किंवा केस कापू शकत नाही. एवढेच नाही तर त्यांना 41 दिवस जमिनीवर झोपावे लागते. या दिवसात ते पायात काहीच घातल नाहीत, अणवाणी पायानेच फिरतात. राम चरण देखील या परंपरेचे पालन करतांना दिसला. आज त्याच्या या 41 दिवसाच्या उपवासाची सांगता झाली आहे.

राम चरणच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच कियारा अडवाणीसोबत 'गेम चेंजर'मध्ये चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय राम चरण 'RC 17' मध्येही दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com