Ram Charan - Dhoni: एक अभिनयातला सुपरस्टार तर दुसरा क्रिकेटचा! राम चरणने घेतली महेंद्रसिंग धोनीची भेट

राम चरण - धोनीचा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झालाय
ram charan meet ms dhoni photo viral rrr movie
ram charan meet ms dhoni photo viral rrr movieSAKAL

Ram Charan - Dhoni News: RRR सिनेमातून राम चरणने भारतात नव्हे तर जगभरात स्वतःची ओळख मिळवली. राम चरणचे जगभरात प्रचंड फॅन आहेत. राम चरण अनेकदा सेलिब्रिटींच्या भेटीगाठी घेत असतो.

राम चरणचा नुकताच एक फोटो सोशल मिडियावर व्हायरल झालाय. यात राम चरणने महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली असल्याचं समजतंय. राम चरण आणि धोनीच्या फोटोवर फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

ram charan meet ms dhoni photo viral rrr movie
Arshad Warsi: 'असूर' नंतर अर्शद वारसीचा नवीन प्रोजेक्ट, ६ वर्षानंतर टीव्हीवर करणार कमबॅक

राम चरणने घेतली धोनीची भेट

राम चरणने नुकतीच महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. RRR फेम राम चरणने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर कॅप्टन कूलसोबतचा फोटो पोस्ट केलाय.

ज्यामुळे राम चरम आणि धोनी या दोघांचे चाहते खूप उत्साहित झाले. राम चरणने फोटो पोस्ट करुन लिहीलंय की, "भारताचा अभिमान महेंद्रसिंग धोनीला भेटून खूप आनंद झाला," असे राम चरण यांनी लिहिले. या दोघांच्या फोटोवर त्यांच्या फॅन्सनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्यात.

राम चरण मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनाला

राम चरण काळा कुर्ता-पायजमा घालून अनवाणी चालत असताना मंगळवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसला होता. त्यानंतर त्याने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मात्र त्याला पाहण्यासाठी मंदिराबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. त्याच्या 41 दिवसांच्या अयप्पा दीक्षेची सांगता झाली. असे बोलले जात आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे बरेच व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहे. त्याला भेटण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

अयप्पा दिक्षेचं कठोर व्रत

राम चरण 41 दिवसांचा कडक उपवास करत आहेत. तो दरवर्षी अय्यप्पाची दीक्षा घेतो. दक्षिण भारतात अयप्पा दीक्षा नावाची परंपरा आहे. जी 41 दिवस चालते, जेथे भगवान अय्यप्पाचे भक्त तीन महीने विलासी जीवनशैलीपासून दूर राहतात आणि सात्त्विक जीवन जगतात. या काळात ते 41 दिवस काळे वस्त्र परिधान करतात.

राम चरण आगामी गेमचेंजर सिनेमातून भेटीला येणार आहे. हा सिनेमा एक पॉलिटीकल थ्रिलर असल्याचं सांगण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com