Ram Charan : राम चरणनं पुन्हा वेधलं लक्ष; अनवाणी पाय अन् काळ्या कपड्यांनिशी ऑस्करसाठी रवाना

राम चरण नुकताच ऑस्कर 2023 च्या कार्यक्रमासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे.
Ram Charan
Ram Charan esakal

Ram Charan : 'RRR' या चित्रपटामुळे जगभरातील चित्रपट रसिकांकडून कौतुकाचा वर्षाव झालेला साऊथचा सुपरस्टार राम चरण कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

Ram Charan
Video : आम्ही निघताना ते धायमोकलून रडत होते; NDRF ने सांगितला PM मोदींना तुर्कीतील घटनाक्रम

एकीकडे अभिनेता लवकरच वडील होणार आहे, तर दुसरीकडे त्याचा 'RRR' चित्रपट ऑस्कर 2023 च्या शर्यतीत आहे.

दरम्यान, अभिनेता राम चरण नुकताच विमानतळावर स्पॉट झाला. पण येथे देखील राम चरणने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते त्याच्या अनवाणी पायांनी आणि अंगावरील काळ्या कपड्यांनी.

राम चरण नुकताच ऑस्कर 2023 च्या कार्यक्रमाल उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. यावेळी तो हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाला.

यावेळी रामचरणने सर्वांचे लक्ष वेधले ते म्हणजे अंगातील काळ्या कपड्यांनी आणि अनवाणी पायांनी. राम चरणाचा वेगळ्या लूकमधील व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, काळे कपडे आणि अनवाणी फिरण्यामागे एक विशेष कारण आहे.

Ram Charan
Virat Kohli : अनुष्काच्या विरूला 'मिस्ट्री गर्ल' ने सगळ्यांसमोर...

राम चरण का फिरतोय अनवाणी अन् काळ्या कपड्यांनी

अंगात काळे कपडे आणि अनवाणी फिरण्यामागे एक कारण आहे. अभिनेता राम चरण दरवर्षी अयप्पा दीक्षा घेतो. केरळमधील सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीला हा विधी पाळावा लागतो.

तसेच भाविकांना ४८ दिवस उपवास करण्यास सांगितले आहे. यावर्षीदेखील राम चरणने अयप्पा दीक्षा घेतली आहे, त्यामुळे रामचरणला ४८ दिवस अनवाणी आणि काळ्या कपड्यांमध्ये राहावे लागणार आहे.

Ram Charan
Thums Up Panipuri : 'थम्स अप पाणीपुरी' चा व्हिडिओ व्हायरल; नेटिझन्सकडून मात्र...

ऑस्कर 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्यासाठी 'RRR' मधील 'नातू नातू' हे गाणे नामांकित झाले असून, याच कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रामचरण नुकताच अमेरिकेला रवाना झाला आहे. हा पुरस्कार सोहळा १२ मार्च रोजी अमेरिकेत संपन्न होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com