RGV Video: 'अप्सरे'सोबत 60 वर्षांचे रामू झाले 'रंगीला', चाहते म्हणाले जरा भान ठेवा!|Ram Gopal Varma bold photoshoot viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Gopal Varma bold photoshoot

RGV Video: 'अप्सरे'सोबत 60 वर्षांचे रामू झाले 'रंगीला', चाहते म्हणाले जरा भान ठेवा!

Ram Gopal Varma Cozy Photos: बॉलीवूडमध्ये असे काही ठराविक दिग्दर्शक आहेत जे त्यांच्या वेगळेपणासाठी ओळखले जातात. त्यांचा मनमानीपणा, हट्टीपणा हा प्रेक्षकांना त्यांच्या (Bollywood Movies) कलाकृतीतून भावल्याचे दिसून आले आहे. सोशल मीडिय़ावर सध्या बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या (Bollywood News) व्हिडिओमध्ये ते एका अभिनेत्रीसोबत ज्या अवस्थेत आहे त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. 60 वर्षांच्या राम गोपाल वर्मांना अशाप्रकारचे व्हिडिओ शेयर करणे (Entertainment News) पटते का, असा सवाल त्यांना नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरुन विचारला आहे. त्या व्हिडिओला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटसही दिल्या आहेत. नेहमी वेगळ्या विषयांवर हटक्या प्रकारच्या कलाकृती सादर करण्यात राम गोपाल वर्मा यांचा हातखंडा असल्याचे दिसून आले आहे.

केवळ चित्रपट दिग्दर्शक अशी राम गोपाल वर्मा अशी त्यांची ओळख नाही. ते राजकीय, सामाजिक परिस्थितीवर देखील सडेतोडपणे कमेंट करणारे सेलिब्रेटी म्हणून सोशल मीडियावर ओळखले जातात. गेल्या काही दिवसांपासून ते त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेतही आले आहे. सध्या त्यांचे काही फोटो नेटकऱ्यांना आवडलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्या फोटोमध्ये राम गोपाल वर्मा हे एका अभिनेत्री समवेत वेगळ्याच अंदाजात समोर आले आहे. 60 वर्षांच्या राम गोपाल वर्मांच्या त्या फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे. वर्मा यांच्यासोबत असणारी ती अभिनेत्री कोण आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. त्याअभिनेत्रीचे नाव अप्सरा असे असून ती राम गोपाल वर्मा यांच्या खतरा द डेंजरस नावाच्या चित्रपटामधून प्रेक्षकांसमोर येणार आहे. हा चित्रपट एक बोल्ड दृश्यांमुळे यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच्या फोटोमुळे अप्सराही चर्चेत आली आहे. ती लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावरील तिच्या फॅनफॉलोअर्समध्येही वाढ झाली आहे. राम गोपाल वर्मा आणि अप्सरा यांच्या इंस्टावरील फोटो पाहिल्यास राम गोपाल वर्मांचा तो बोल्ड अंदाज चाहत्यांना आश्चर्यचकित केल्याशिवाय राहणार नाही. त्या दोन्ही सेलिब्रेटींनी हॉट फोटोशुट केलं आहे. नेटकऱ्यांनी त्यांचा व्हिडिओ पाहिल्यावर त्याला 'ब्यूटी एंड द बीस्ट' अशा प्रकारच्या कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. खतरा द डेंजरस ही भारतातील पहिली लेस्बियन फिल्म असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Ram Gopal Varma Bold Photoshoot Viral With Young Actress Social Media Trolled

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top