Ram Gopal Varma: त्याचे 70 तुकडे करावेत.. श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणी राम गोपाल वर्मा यांचे ट्विट

देशाची झोप उडवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्ये प्रकरणी अखेर चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा स्पष्टच बोलले.
Ram Gopal Varma Reacts To Shraddha Walkar Murder Case, Come Back And Cut Him Into 70 Pieces
Ram Gopal Varma Reacts To Shraddha Walkar Murder Case, Come Back And Cut Him Into 70 Piecessakal

Ram gopal varma on Shraddha Walkar Murder Case: सध्या महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाची झोप उडवणारं 'श्रद्धा वालकर; हत्या प्रकरण समोर आलं आहे. आफताब पूनावाला या तरुणाकडून फसवणूक आणि मग अत्यंत निर्घृणपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा सर्व स्तरातून निषेध केला जात असतानाच बॉलीवुडमध्ये प्रसिद्ध निर्माते राम गोपाल वर्मा यांनीही ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. एवढेच नाही तर अत्यंत कठोर शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

(Ram Gopal Varma Reacts To Shraddha Walkar Murder Case, Come Back And Cut Him Into 70 Pieces)

Ram Gopal Varma Reacts To Shraddha Walkar Murder Case, Come Back And Cut Him Into 70 Pieces
Drishyam 2: तगडी स्टारकास्ट आणि कोटींचे मानधन! जाणून घ्या कुणी घेतले किती पैसे..

मूळची वसईची असलेली श्रद्धा प्रियकर आफताब पूनावालाबरोबर आधी नायगाव येथे राहत होती मात्र नंतर ते दिल्लीमध्ये स्थायिक झाले. दिल्लीला गेल्यावर श्रद्धाने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. या मुद्द्यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाला. भांडणादरम्यान आफताबने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे करून 18 दिवस फ्रीजमध्ये ठेवले. दरम्यान तो इतर मुलींशी डेट करत होता. पोलिसांनी आफताबला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. अशा गुन्हेगाराला काठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्वजण आग्रही आहेत. अगदी सोशल मीडियावरही या प्रकरणावर चर्चा होत आहेत. अनेक कलावंत त्याबाबत व्यक्त होत आहे. आता राम गोपाल वर्मानं (Ram Gopal Varma) यांनीही ट्वीट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

Ram Gopal Varma Reacts To Shraddha Walkar Murder Case, Come Back And Cut Him Into 70 Pieces
Anu Aggarwal: शो मध्ये बोलावलं आणि.. 'आशिकी' फेम अनु अग्रवालचे 'इंडियन आयडल 13' निर्मात्यांवर गंभीर आरोप

"तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत' असं ट्वीट राम गोपाल वर्मानं शेअर केलं आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटलं आहे की, 'केवळ कायद्याच्या भीतीने क्रूर हत्या रोखता येत नाहीत. पण त्या घटनेचा बळी ठरलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं परत येऊन मारेकऱ्यांना मारले तर ते नक्कीच हे थांबवता येईल. देवाने याचा विचार करावा आणि आवश्यक ते करावे ही विनंती.'

पुढे ते म्हणतात, 'तिच्या आत्म्याला शांती मिळण्याऐवजी तिने परत यावे आणि त्याचे 70 तुकडे करावे.' राम गोपाल वर्मा यांच्या या ट्वीटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. सध्या सर्व देशाचे लक्ष श्रद्धा हत्या प्रकरणावर लागलेले आहे. सर्व स्तरातून तिच्या मारेकऱ्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com