Ram Gopal Varma: या आधीही अनेकदा बरळलेत राम गोपाल वर्मा? झाला होता राडा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Gopal Varma's controversial statement licking ashu reddy's toes

Ram Gopal Varma: या आधीही अनेकदा बरळलेत राम गोपाल वर्मा? झाला होता राडा..

Ram Gopal Varma News: सतत वादात अडकणं, वादग्रस्त बोलणं, अनेकांची नाराजी ओढावून घेणं यामध्ये बॉलीवुड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा सर्वात आघाडीवर आहेत. ते काही बोलले नाही आणि राडा झाला नाही असे क्वचितच होते. त्यामुळे सतत चर्चेत असलेले रामू आता तर वादाच्या सर्वोच्च शिखरावर आहेत. नुकतीच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते अभिनेत्री आशु रेड्डीचे पाय चाटत आहेत. हे प्रकरण सध्या गाजत आहे, पण रामूसाठी हे काही नवीन नाही. या आधीही त्यांनी अनेक वादग्रस्त विधानं केली आहेत, त्याचाच हा धांडोळा..

(Ram Gopal Varma controversial statement licking ashu reddy's toes )

हेही वाचा: Kedar Shinde: सावध राहा! केदार शिंदे यांचे फेसबूक अकाऊंट हॅक..

प्रशांत नील दिग्दर्शित आणि दाक्षिणात्य अभिनेता यश याचा दमदार अभिनय असलेला केजीफ-२ हा चित्रपट भरपूर गाजला. १४ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. पण रामूने मात्र त्यावर वादग्रस्त विधान केले होते. ते म्हणाले होते, ''बॉलिवुडमधील कोणालाही 'केजीएफ २' हा चित्रपट आवडला नाही. तरीही त्याला इतकं यश का मिळालं हा मोठा संभ्रमच आहे. बॉलिवुडच्या एका मोठ्या दिग्दर्शकाने मला सांगितले की, रामू, मी हा चित्रपट ५ वेळा पाहण्याचा प्रयत्न केला पण मी अर्ध्या तासाच्या पुढे तो पाहू शकलो नाही. अत्यंत तर्क हीन असा हा चित्रपट आहे. पण हॉलीवूडमध्ये एक ओळ आहे, ‘तुम्ही आशयाशी वाद घालू शकता, पण यशाशी वाद घालू शकत नाही’! म्हणूनच, तुम्हाला चित्रपट आवडो किंवा न आवडो तुम्ही त्याच्या यशाकडे दुर्लक्ष करू शकत नाही,' असे ते म्हणाले होते. यावरून मोठा वाद झाला होता.

इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर कंगणा रणावत 'इमर्जन्सी' हा चित्रपट घेऊन येत आहे. याचा ट्रेलर आला तेरा कंगनानं इंदिराजींची ज्याप्रकारे भूमिका साकारली आहे त्याचे कौतूक झाले. पण रामू म्हणाले, 'मला तर असं वाटतं की, इंदिराजींनी कंगनासारखी भूमिका केली आहे.' ही विधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका करणारे वाटल्याने अनेकांनी वर्मा यांना ट्रोल केले होते.

एवढेच नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही रामूने सोडले नाही. राष्ट्रपतीपद जाहीर होण्याआधी गोपाल वर्मा यांनी आपल्या व्टिटमधून एक प्रश्न उपस्थित केला होता. त्यामध्ये ते म्हणले होते, 'जर द्रौपदी राष्ट्रपती आहे तर मग पांडव कोण आहे, याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे कौरव कोण आहेत,' या ट्विटनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला होता.

तर लग्न आणि घटस्फोट याबाबतही त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. 'प्रेमाला सर्वांत जलद गतीने मारून टाकणारी गोष्ट म्हणजे लग्न. आनंदी राहण्यामागचं गुपित म्हणजे जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत प्रेम करत राहा आणि आयुष्यात पुढे निघून जा. लग्नासारख्या तुरुंगात जाण्यापेक्षा हा मार्ग चांगला आहे', असं ते एका ट्विटमध्ये म्हणाले. वैवाहिक जीवनातील प्रेम ते साजरा केलेल्या दिवसांपेक्षा कमी दिवस टिकतं, जे तीन ते पाचच दिवस असतं. हुशार लोकं प्रेम करतात आणि मूर्ख लोक लग्न करतात, असं ते म्हणाले होते..

टॅग्स :ram gopal varma