esakal | 'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीची पुन्हा 'बॉलीवूड इंट्री'
sakal

बोलून बातमी शोधा

actress mandakini

'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीची पुन्हा 'बॉलीवूड इंट्री'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आपल्या अभिनयानं कोणेएकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणून मंदाकिनीचे (mandakini) नाव घेता येईल. तिला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती राम तेरी गंगा मैली (ram teri ganga maili) या चित्रपटाच्या माध्यमातून. त्या चित्रपटात तिनं काही बोल्ड सीन दिले होते. त्यामुळे मंदाकिनी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. आता त्या सीनचे प्रेक्षकांना विशेष काही वाटणार नाही. मात्र 80 च्या दशकात याप्रकारची दृश्ये देणं ही धाडसाची बाब म्हणावी लागेल. आता मंदाकिनी पुन्हा कमबॅक करण्यासाठी तयार आहे.(ram teri ganga maili actress mandakini will soon making a comeback yst88)

गेल्या अनेक वर्षांपासून मंदाकिनीनं (mandakini) बॉलीवूडपासून (bollywood) लांब राहणं पसंत केलं. तिच्याभोवती अनेक वाद चिकटले होते. अंडरवर्ल्ड जगताशी तिचे संबंध होते. अशीही चर्चा होते. एका गुन्हेगाराशी तिनं लग्न केलं हे तिच्या चाहत्यांना काही आवडले नाही. यासगळ्या प्रकारामुळे मंदाकिनी कायम चर्चेत राहिली. ती 19 वर्षानंतर पुन्हा बॉलीवूडमध्ये येण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी तिनं बातचीत केली. त्यावेळी तिनं याबाबत अधिर माहिती दिली आहे.

सध्या मंदाकिनी ही एका चित्रपटाची पटकथा वाचण्यात व्यस्त आहे. ती आता लवकरच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसण्याची शक्यता आहे. तिचे मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी ही माहिती दिली आहे. त्याचे म्हणणे आहे की, मंदाकिनी पुन्हा पडद्यावर प्रेक्षकांना दिसणार आहे. ती त्याच्या तयारीत आहे. अद्याप तिला दमदार अशी भूमिका मिळालेली नाही. मात्र भूमिका मिळाल्यास पुन्हा बॉलीवूडमध्ये इंट्री करण्याचा तिचा विचार आहे. तिला मुख्य भूमिका हवी आहे. त्यासाठी ती प्रयत्नशील आहे.

हेही वाचा: मम्मा 'करीना' आणि बेबी ‘जेह’चे क्युट फोटो व्हायरल

हेही वाचा: अरुंधती करणार तिचे शिक्षण पूर्ण

मंदाकिनीचा भाऊ भानु तिला पुन्हा अॅक्टिंगच्या क्षेत्रात येण्याची विनंती करतो आहे. भानुनं सांगितलं की, ती जेव्हा कोलकाताला दुर्गा पूजासाठी गेली होती तेव्हा तिथे मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली होती. छोटी सरदारनीमध्ये तिला एक रोल ऑफर झाला होता. मात्र तिनं त्या रोलला नकार दिला. तिनं त्याठिकाणी अभिनेत्री अनिता राजचे नाव सुचवले.

loading image