Ramayan Movie: रणबीरच्या 'रामायण'ची जय्यत तयारी; कोणत्या देशात होणार "लंका दहन"?

रणबीर कपूर आता 'रामायण' (Ramayan) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Ramayan Movie
Ramayan Movie

Ramayan Movie: अभिनेता रणबीर कपूर आता 'रामायण' (Ramayan) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या 'ॲनिमल' (Animal) या चित्रपटानंतर रणबीर कपूर आता 'रामायण' (Ramayan) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. नितेशच्या 'रामायण' या चित्रपटाचं शूटिंग मुंबई आणि लंडन येथे होणार आहे.

'या' देशात होणार 'लंका दहन' चं शूटिंग

नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग मुंबईत होणार आहे. रिपोर्टनुसार, रणबीर कपूर हा पहिले 60 दिवस मुंबईत शूटिंग करणार असून त्यानंतर तो लंडनमध्ये शूटिंग करणार आहे. नितेश तिवारीच्या 'रामायण' या चित्रपटातील लंका दहन या सीनचं शूटिंग लंडनमध्ये होणार आहे. लंडनच्या शेड्यूलमध्ये रणबीर आणि यश हे दोघे हा सीन शूट करणार आहेत.

'रामायण' ची स्टार कास्ट

नितेश तिवारीचा 'रामायण' या चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटातील प्रभू श्री रामच्या भूमिका रणबीर कपूर साकारणार आहे, तर या चित्रपटात सीतेची भूमिका साई पल्लवी साकारणार आहे. तसेच या चित्रपटात केजीएफ स्टार यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच हनुमानाच्या भूमिका सनी देओल साकारणार आहे.

प्रभू श्री रामाच्या भूमिकेची तयारी करण्यासाठी रणबीरनं दारू आणि मांसाहाराचा त्याग केला आणि रात्री उशिरापर्यंतच्या पार्ट्यांमध्ये सहभागी होणे देखील बंद केलं आहे, असं म्हटलं जात आहे. आता नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com