Kubra Sait : 'सेक्रेड गेम्सची कुकू' रणबीरच्या रामायणात साकारणार 'शूर्पणखा'? ऑडिशन दिली!

प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारीच्या रामायण नावाच्या चित्रपटाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
Actress Kubrra Sait Auditioned To Play Surpnakha
Actress Kubrra Sait Auditioned To Play Surpnakha esakal

Actress Kubrra Sait Auditioned To Play Surpnakha : प्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारीच्या रामायण नावाच्या चित्रपटाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या चित्रपटाबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहे. त्यात मुख्य भूमिका कोण साकारणार, इतर भूमिकेत कुणाची निवड झाली आहे याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

मीडिया रिपोर्टस नुसार, नितेश तिवारी यांच्या रामायण या प्रोजेक्टसोबत सनी देओल (Sunny Deol) , बॉबी देओल (Bobby Deol) , लारा दत्तानंतर (Lara Dutta) आता आणखी एका अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. तिचे नाव आहे कुब्रा सैत (Kubra Sait) . ही तिच अभिनेत्री आहे जिनं (Sacred Games web serise) नवाझुद्दीन सिद्धकीच्या सेक्रेड गेम्समध्ये कुकूची भूमिका (Nawazuddin Siddique) साकारली होती. या भूमिकेनं तिला वेगळी ओळख मिळवून दिली होती. आता तिच्या नावावर एक महत्वाची भूमिका नोंदली जाणार आहे. अशी चर्चा आहे.

कुब्रा ही नितेश तिवारीच्या आगामी रामायण नावाच्या चित्रपटामध्ये शुर्पणखेच्या भूमिकेत (Shrupnakha Character) दिसणार असल्याची चर्चा आहे. तिनं त्यासाठी ऑडिशनही दिल्याचे दिसून आले आहे. मात्र (Ramayana Movie News) याबाबत निर्माते किंवा कुब्राकडून कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही. आज तक नं याविषयी सविस्तर माहिती देणारे वृत्त दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून तिवारीच्या रामायण चित्रपटातील कास्टिंगविषयी चर्चा सुरु झाली आहे.

सनी देओल, बॉबी अन् लारा यांची त्या रामायणावरील आधारित चित्रपटात महत्वाची भूमिका असणार आहे. याच चित्रपटात रावणाच्या भूमिकेत केजीएफचा यश असून कुब्राही वेगळ्या (OTT Released Movie) भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर कुब्राचा चाहतावर्ग मोठा आहे.

सेक्रेड गेम्सशिवाय तिनं जवानी जानेमन सारख्या प्रोजेक्टमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती. या बरोबरच काजोलची ट्रायल आणि शाहिद कपूरची फर्जी नावाच्या मालिकेमध्ये देखील तिनं महत्वाची भूमिका साकारली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉबी देओल या (New OTT Released Movie web serise ) चित्रपटामध्ये कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉबी हा साऊथचा सुपरस्टार सुर्या सोबत कंगुवामध्ये देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. (Surya Kanguwa Movie)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com