राणा दग्गुबत्ती मिहिका बजाजसोबत लवकरच अडकणार विवाहबंधनात, या तारखेला होणार विवाहसोहळा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

मुंबई: बाहुबली या चित्रपटामध्ये भल्लालदेवची व्यक्तिरेखा साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबत्ती हल्ली सोशल मीडियावरचा खूप चर्चेत असलेला चेहरा आहे. चित्रपटांमुळे आणि त्यातील भूमिकांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

मुंबई: बाहुबली या चित्रपटामध्ये भल्लालदेवची व्यक्तिरेखा साकारणारा दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबत्ती हल्ली सोशल मीडियावरचा खूप चर्चेत असलेला चेहरा आहे. चित्रपटांमुळे आणि त्यातील भूमिकांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.

परंतु त्याच्या खासगी जीवनातही तो चर्चेचा विषय नेहमीच असतो. राणा दग्गुबत्ती आणि मिहिका बजाज यांची लव्हस्टोरी ही साऊथ इंडस्ट्रीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतील चर्चेचा विषय होता. परंतु त्यांनी याच महिन्यात आपला साखरपुडा गुपचूप उरकला. त्यांची माहिती राणाने सगळ्यांना सोशल मीडियावर दिली आणि आता बातमी अशी आहे की ते दोघेही ८ आॅगस्ट रोजी विवाह बंधनात अडकणार आहेत. राणाचे वडील निर्माते सुरेश बाबू यांनी ही माहिती  दिली. 

हेही वाचा: ''मला गर्भपाताची परवानगी द्या'' ; कोणी केली मागणी?..वाचा.. 

राणा दग्गुबत्तीने तमीळ आणि तेलगू या चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटांतही काम केले आहे. बाहुबलीतील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. हिंदीमध्ये द गाझी अटॅक, दम मारो दम, हाऊशफुल ४, ये जवानी है दिवानी या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे आणि हाथी मेरे साथी हा त्याचा चित्रपट आता येणार आहे.

साऊथ इंडस्ट्रीतील हा एक चर्चेत असलेला चेहरा आहे. मिहिका बजाज ही एका इव्हेंट कंपनीची संस्थापक आहे. या दोघांचा साखरपुडा नुकताच झाला. त्यामुळे ते या वर्षअखेरीस विवाह बंधनात अडकतील असेच सगळ्यांना वाटत होते.

राणाच्या चाहत्यांनीही असाच अंदाज वर्तविला होता. परंतु राणाचे वडील सुरेश बाबूंनी एका मुलाखतीमध्ये राणा आणि मिहीका यांच्या विवाहाची तारीख जाहीर केली. ते मुलाखतीमध्ये म्हणाले, की 'दोन्ही कुटुंबातील माणसांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा ८ आॅगस्ट रोजी पार पडणार आहे.

हेही वाचा: मुंबईकरांनो सावधान ! ३ जूनला चक्रीवादळ महाराष्ट्र किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

कोरोनामुळे घ्यावयाची काळजी आम्ही घेणार आहोत. सरकारच्या नियमांचे पालन आम्ही करणार आहोत आणि हा सोहळा पार पडणार आहे.' असे त्यांनी या ट्विट मध्ये सांगितले आहे. त्यामुळे ही बातमी ऐकून राणाचे चाहते फार खुष आहेत.

rana dagubatti will marry mihika bajaj soon 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rana dagubatti will marry mihika bajaj soon