
alia bhatt and ranbir kapoor : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यावर्षी त्यांच्या बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र' (brahmastra movie) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. दोघेही त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक ठिकाणी हजेरी लावत आहेत. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीनंतर रणबीर आणि आलिया दोघेही रेकॉर्डिंग स्टुडिओमधून बाहेर पडताना दिसले. या दोघांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सध्या दोघेही त्यांच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच कामासाठी ते एका डबिंग स्टुडिओमध्ये गेले होते. मध्यरात्री उशिरा काम आवरल्यानंतर दोघेही घरी जाताना एकत्र दिसले. त्यावेळी अनेकांच्या नजरा आलियाकडे गेल्या. गरोदर पणातही दिवसरात्र काम करत असल्याने आलियाचे व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र कौतुक झाले.
यावेळी रणबीर (ranbir kapoor) आणि आलिया दोघेही प्रचंड थकलेल्या अवस्थेत होते. रणबीरने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला होता तर तर आलिया केशरी-पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये होती. लवकरच ती आई होणार असल्याने सर्वांचे लक्ष सध्या आलियाकडे (alia bhatt) आहे. रणबीर-आलियाचा हा व्हिडिओ पाहून चाहते खुश झाले आहेत. ते दोघेही 'ब्रह्मास्त्र' चित्रपटासाठी खूप मेहनती घेत असल्याचे बोलले जात आहे.
कियान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ हा चित्रपट काही दिवसात म्हणजेच ९ सप्टेंबर रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात रणबीर-आलिया शिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय देखील दिसणार आहेत. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.