संजय दत्तच्या कॅन्सरची बातमी ऐकून रात्री उशीरा रणबीरने घेतली त्याला भेटण्यासाठी धाव, सोबत दिसून आली आलिया भट्ट

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 13 August 2020

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट संजय दत्तच्या घराबाहेर दिसून आले. रात्री उशीरा रणबीर आणि आलिया त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसले.

मुंबई- अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय दत्तला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने तो लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. तो बरा होऊन घरी देखील आला. त्यानंतर त्याने थोड्या वेळाने सोशल मिडियावर सिनेमातून काही काळ ब्रेक घेत असल्यातं सांगितलं. यासोबतंच संजय दत्तची पत्नी मान्यतानेही संजय दत्तला कॅन्सर झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला. सोशल मिडियावर संजय दत्तचे चाहते त्याच्या लवकर ठिक होण्याची प्रार्थना करत आहेत. तर सेलिब्रिटीही त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचत आहे. 

हे ही वाचा: 'फुकटमध्ये पण तुझा सिनेमा पाहणार नाही', आलिया भट्ट झाली ट्रोल

नुकतंच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट संजय दत्तच्या घराबाहेर दिसून आले. रात्री उशीरा रणबीर आणि आलिया त्याच्या घरातून बाहेर पडताना दिसले. सोशल मिडियावर दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सडक २ सिनेमात संजय दत्तसोबत आलिया भट्टने काम केलं आहे. अशातंच आपल्या सहकलाकाराची विचारपूस करण्यासाठी आलिया रणबीरसोबत संजूच्या घरी रात्री उशीरा दिसून आली. दोघंही संजूला भेटण्यासाठी एकाच गाडीतून आले. 

मंगळवारी रात्री उशीरा संजय दत्तला कॅन्सरचं निदान झाल्याचं कळालं. ही गोष्ट वा-यासारखी पसरली. तेव्हापासूनंच संजयचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी तो लवकर यातून ठीक व्हावा यासाठी प्रार्थना करत आहेत. नुकतंच संजयची पत्नी मान्यताने देखील अधिकृत स्टेटमेंट प्रसिद्ध केलं होतं. ज्यामध्ये तिने शुभचिंतकांचे आभार मानले होते.

तिनं लिहिलं होतं, 'मी त्या सगळ्यांचे आभार मानू इच्छिते जे संजयच्या लवकरच ठिक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. या कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी हिंमत आणि प्रार्थनांची गरज आहे. आमचं कुटुंब आधीच अनेक संकटांतून गेलंय पण मला खात्री आहे की ही वेळ देखील निघून जाईल.'

ranbir kapoor and alia bhatt snapped outside sanjay dutt residence  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranbir kapoor and alia bhatt snapped outside sanjay dutt residence