ranbir kapoor
ranbir kapoorSakal

Ranbir Kapoor: सौरव गांगुली नाही तर या प्रसिद्ध गायकाच्या बायोपिकवर 11 वर्षांपासून काम करत आहे रणबीर कपूर

रणबीर कपूर सौरभ गांगुलीसोबत 'तू झुठी मैं मक्कार' या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दिसला होता. यासोबतच रणबीर या क्रिकेटपटूच्या बायोपिकमध्ये काम करत असल्याची अफवाही जोर धरू लागली आहे.

लव रंजनच्या प्रॉडक्शन हाऊसने सप्टेंबर 2021 मध्ये दादा सौरव गांगुलीचा बायोपिक बनवण्याची घोषणा केली. तेव्हापासून चित्रपटाची स्टारकास्ट किंवा दिग्दर्शन याबाबत कोणतेही अपडेट आलेले नाही. मात्र, अलीकडच्या काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'ब्रह्मास्त्र' अभिनेता रणबीर कपूर या बायोपिकमध्ये सौरव गांगुलीची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे.

दरम्यान, रणबीर लव रंजनचा चित्रपट 'तू झुठी मैं मक्कार'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. कोलकाता येथे एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये, रणबीरने पुष्टी केली की तो सौरव गांगुलीच्या नव्हे तर दिग्गज गायक-अभिनेता किशोर कुमारच्या बायोपिकमध्ये काम करणार आहे.

आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोलकाता येथे पोहोचलेल्या रणबीरने मीडिया संवादादरम्यान पुष्टी केली की तो गायक-अभिनेता किशोर कुमार यांच्या बायोपिकवर काम करत आहे. यादरम्यान रणबीरला असेही विचारण्यात आले की, तो क्रिकेटर सौरव गांगुलीचा बायोपिक करतोय का?

सौरव गांगुलीच्या बायोपिकबद्दल बोलताना रणबीर म्हणाला, “मला वाटते दादा (सौरव गांगुली) हे केवळ भारतातच नाही तर जगभरातील एक लिविंग लेजंड आहेत आणि त्यांच्यावर बनवलेला बायोपिक खूप खास असेल. मात्र, मला या चित्रपटाची ऑफर आलेली नाही. मला वाटते की लव फिल्म्सचे निर्माते अजूनही स्क्रिप्ट लिहित आहेत.

ranbir kapoor
Huma Qureshi: तू प्रेग्नंट आहेस का?, हुमा कुरेशी बनली बॉडी शेमिंगची शिकार तो फोटो पाहताच नेटकऱ्यांमध्ये एकच चर्चा

रणबीरने किशोर कुमारच्या बायोपिकचा भाग असल्याबद्दल सांगितले आणि शेअर केले, “मी 11 वर्षांपासून किशोर कुमारच्या बायोपिकवर काम करत आहे. आम्ही ते अनुराग बसूसोबत लिहित आहोत आणि मला आशा आहे की हा माझा पुढचा बायोपिक असेल. पण दादांवर बायोपिक बनत आहे यावर मी आजपर्यंत काहीही ऐकले नाही. त्यामुळे मला माहीत नाही.''

त्याच वेळी, क्रिकेटर सौरव गांगुली आणि रणबीर कपूर अलीकडेच ईडन गार्डन्सवर एकत्र स्पॉट झाले होते. दोघांच्या एकत्र छायाचित्रांमुळे बायोपिकच्या अफवांना उधाण आले आहे. 'संजू'मध्ये संजय दत्तची भूमिका साकारल्यानंतर चाहत्यांना रणबीर कपूरला आणखी एका बायोपिकमध्ये पाहण्याची इच्छा आहे.

रणबीर दिग्गज किशोर कुमारचा बायोपिक करत असल्याची पुष्टी झाली आहे. या सगळ्यामध्ये रणबीर 'तू झुठी मैं मक्कार'च्या तयारीत आहे. हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होत आहे. यामध्ये त्याने पहिल्यांदाच श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com