रणधीर कपूरना 'Dementia' आजार; रणबीरकडे केली ऋषी कपूरना भेटायची विनंती

अभिनेता रणबीर कपूर यानं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रणधीर कपूर यांना स्मृतीभंश झाल्याचं सांगितलं आहे.
Randhir Kapoor
Randhir KapoorGoogle

करिष्मा कपूर आणि करिना कपूरचे(Kareena Kapoor) वडिल,कपूर खानदानचे मोठे चिरंजीव आणि बॉलीवूडचे एकेकाळचे हरहुन्नरी अभिनेते रणधीर कपूर(Randhir Kapoor) यांनी आता वयाची ७५ वर्ष पूर्ण केलीयत. पण या वयात त्यांना नेमकं एका आजारानं ग्रासलंय,ज्याला 'डिमेन्शिया' म्हणतात. म्हणजेच यामध्ये आजारी व्यक्तीचा स्मृतीभ्रंश व्हायला सुरुवात होते. पण रणधीर कपूर यांना खूप लवकर याची लक्षणं सुरू झालीयत असं स्वतः अभिनेता रणबीर कपूरनं आपल्या मोठ्या काकांच्या आजाराविषयी माहिती देताना सांगितलं आहे. तशी ही बातमी कानावर होतीच की आपले दोन्ही लहान भाऊ ऋषी आणि राजीव कपूर यांच्या पाठोपाठ निधनामुळे रणधीर कपूर यांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे. रणधीर कपूर आपल्या भावांच्या निधनानंतर आपल्याला खूप एकाकी वाटत आहे,जगण्यात रस नाही अशी दुःखाची भाषा नेहमीच करत असतात अशी माहिती कपूर कुटुंबातील जवळच्याच नातेवाईकानं दिली होती.

Randhir Kapoor
अतरंगी फॅशन करणाऱ्या उर्फीला जेव्हा मृत्यूनं गाठलं,आईनं वाचवलेयत प्राण

रणबीर कपूरनं(Ranbir Kapoor) नुकत्याच एका मुलाखतीत रणधीर कपूर यांच्या तब्येतीविषयी मोठा खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की,''रणधीर कपूर यांनी नुकताच ऋषी कपूर(Rishi kapoor) यांचा मृत्यूपश्चात प्रदर्शित झालेला 'शर्माजी नमकीन' हा सिनेमा पाहिला. त्यानंतर अचानक मला म्हणतात,''अरे ऋषी कुठेय,बोलाव त्याला,त्यानं मस्त काम केलंय,मला त्याला शुभेच्छा द्यायच्यात. हे ऐकून दोन मिनिटं मी थबकलो. मला कळेना काय बोलू त्यावर''. ऋषी कपूर यांचं २०२० साली एप्रिल महिन्यात कॅन्सरच्या आजारानं निधन झालं आहे. एनडीटीव्ही या वाहिनीशी बोलताना रणबीरनं सांगितलं,''माझे काका रणधीर कपूर स्मृतीभंशाच्या आजाराचा सामना करीत आहेत. सिनेमा पाहिल्यानंतर माझ्याकडे आले आणि म्हणाले बाबांना सांग त्यानं मस्त काम केलंय,कुठेय तो? कॉल कर त्याला. त्यापुढे सांगताना रणबीर म्हणाला,कला खरंच कुठल्याही आजारावर चांगल्या औषधासारखं काम करते. तुम्हाला आनंद देते,दुःख विसरायला लावते''.

Randhir Kapoor
हरभजन सिंगनं हॉटेल्समधल्या प्लेट्स फोडल्या,पत्नीनंही दिली साथ; काय घडलं?

रणधीर कपूर यांनी याआधी टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राला २०२१ साली दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं,''गेलं वर्ष माझ्यासाठी खूप वाईट काळ ठरला. दहा महिन्यात मी माझ्या दोन लहान भावांना गमावलं. त्यानंतर माझी आई गेली. माझी बहिण रितू आम्हाला सोडून गेली. गेल्या दोन वर्षात आमच्या कुटुंबानं खूप जवळची माणसं गमावली आहेत''. बॉलीवूडचे शो मॅन राज कपूर यांना पाच मुलं. तीन मुलगे आणि दोन मुली. हे पाचही जण अगदी उतारवयातही एकमेकांच्या खूप जवळ होते. एकमेकांसोबत राहत नसले तरी चौकशीतनं,अधनंमधनं भेटून आमचं नातं आम्ही खास जपलं होतं असंही रणधीर कपूर त्या मुलाखतीत म्हणाले होते. ऋषी कपूर यांचा 'शर्माजी नमकीन' सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. हा ऋषी कपूर यांचा शेवटचा सिनेमा ठरला. या सिनेमात परेश रावल यांनी ऋषी कपूर यांचा राहिलेला भाग चित्रित केला आहे. कारण तो शूट करण्याआधीच ऋषी कपूर आजारी पडले होते अन् त्यात त्यांचे निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com