सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपने १० किलो वजन घटवलं, २२ किलोचं आहे टार्गेट

सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपला एकूण २२ किलो वजन कमी करायचे आहे.
randeep hooda loss 22 kg weight  for play swatantraveer sawarkar role
randeep hooda loss 22 kg weight for play swatantraveer sawarkar rolesakal
Updated on

swatantraveer sawarkar : दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांनी सध्या नवनवीन चित्रपटांचा जणू सपाटाच लावला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वीर दौडले सात या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याला काही दिवस उलटले असतानाच त्यांनी एका नव्या चित्रपटाची घोषणा केली. आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (swatantraveer sawarkar movie) यांच्या १३९ व्या जयंतीचार औचित्य साधून मंगेश मांजरेकर सावरकरांच्या आयुष्यावर चित्रपट करत असल्याचे उघड केले. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांनी मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली. त्यामध्ये सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हुडा (randeep hooda) असणार आहे (randeep hooda as swatantraveer sawarkar) आहे. (Randeep Hooda’s first look as Swatantra Veer Savarkar launched on latter 139th birth anniversary)

randeep hooda loss 22 kg weight  for play swatantraveer sawarkar role
'बॉलिवूड कधीही संपणार नाही' बाॅलिवूड साऊथ वादावर अखेर रोहित शेट्टी बोललाच

भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांचे कार्य देशासाठी बहुमोलाचे आहे. परंतु काळाने कधीही त्यांचा यथोचित सन्मान केला नाही. याच सावरकरांचे चरित्र, कार्य आणि विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी महेश मांजरेकर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट घेऊन आले आहेत. नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती संदीप सिंह आणि आनंद पंडित करणार असून रणदीप हुडा वीर सावरकरांच्या भूमिकेत आहे. पोस्टर मध्ये रणदीप हुबेहूब सावरकरांसारखा दिसत आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी रणदीपने जोरदार तयारी सुरू केली आहे. (randeep hooda loss 22 kg weight for play swatantraveer sawarkar role)

निर्माते संदीप सिंह यांनी सांगितले, 'रणदीप आपल्या भूमिकेसाठी किती मेहनत घेतो हे सर्वांनाच माहिती आहे. तो भूमिकेला न्याय देण्यासाठी अतोनात प्रयत्न करतो. 'सरबजीत' चित्रपटात साठीही त्याने बरेच वजन कमी केले होते. सावरकरांचे देहयष्टी बारीक होती. त्यामुळे तसे दिसणे ही भूमिकेची गरज आहे. म्हणून सावरकरांच्या भूमिकेसाठी तो दोनदा वजन कमी करणार आहे. या भूमिकेसाठी एकूण २२ किलो वजन कमी करायचे आहे. आतापर्यंत त्याने 10 किलो वजन कमी केले आहे. पुढच्या दोन महिन्यांत तो सुमारे 12 किलो आणखी वजन कमी करणार आहे. म्हणजेच तो एकूण 22 किलो वजन कमी करणार आहे.' याशिवाय रणदीप मराठी भाषेचा अभ्यास करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com