'बॉलिवूड कधीही संपणार नाही' बाॅलिवूड साऊथ वादावर अखेर रोहित शेट्टी बोललाच

बॉलिवूड विरुद्ध साऊथ वाद गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु असून आता दिग्दर्शक रोहित शेट्टीने देखील यावर भाष्य केले आहे.
rohit shetty on bollywood vs south war
rohit shetty on bollywood vs south war sakal
Updated on

गेल्या काही दिवसांत बॉलीवूड आणि साऊथ इंडस्ट्री मध्ये बरीच शाब्दिक बाचाबाची सुरू आहे. साऊथ सिनेमातील अभिनेता किच्चा सुदीपने हिंदी भाषेवरनं एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अजय देवगणने ट्वीट करून त्याला खडे बोल सुनावले होते. बस्स,त्यानंतर मग साऊथ सिनेइंडस्ट्री आणि बॉलीवूडमध्ये रोज दिवसाला एक तरी नवा मुद्दा काढून वाद छेडला जाऊ लागला. बॉलिवूड विरुद्ध साऊथ हा वाद संपायचं काही नाव घेत नाही. आता दिग्दर्शक रोहित शेट्टीनेही (rohit shetty) या वादावर भाष्य केल आहे.

rohit shetty on bollywood vs south war
सौ सोनार की एक लोहार की, 'त्या' एका वाक्यात मृन्मयीने ट्रॉलर्सला गार केलं

रोहित शेट्टी आणि अभिनेता रणवीर सिंग यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी रोहितला दाक्षिणात्य चित्रपटांमुळे बॉलिवूडवर काही परिणाम होतो का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी तो म्हणाला, 'बॉलिवूड आता संपलं आहे असा विचार जे लोक करतात त्यांना त्यामधून अधिक आनंद मिळतो. पण बॉलिवूड कधीच संपणार नाही. सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक ए आर रहमान देखील साऊथमधूनच आले आहेत. ओटीटी जेव्हा आलं तेव्हा देखील लोकांनी म्हटलं बॉलिवूड आता संपणार. काही लोक ‘बॉलिवूड संपणार’ हे ऐकूनच खूश होतात.' (Rohit Shetty on bollywood south cinema debate ‘Bollywood kabhi khatam nahi hoga’)

रोहित पुढे बोलताना म्हणाला की, 'जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर ८०-९०च्या दशकामधील नावाजलेल्या अभिनेत्री जया प्रदा आणि श्रीदेवी यादेखील साऊथमधूनच आल्या होत्या. जीतू जी यांच्या चित्रपटांचा जो काळ होता तेव्हा देखील ‘हिम्मतवाला’पासून ते ‘जस्टिस चौधरी’ चित्रपटापर्यंत साऊथचेच चित्रपट होते. बॉलिवूड आणि साऊथमध्ये कोणताच वाद नाही. तसेच बॉलिवूड चित्रपट कायम प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहणार,' असेही तो म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com