
Marathi Serial TRP: ओटीटीचे प्रस्थ कितीही वाढले तरी मालिकांची जादू काही कमी झालेली नाही. आजही चांदया पासून बांदयापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात. सध्या मराठीमध्ये पाच वाहिन्या आणि पंचवीस हून अधिक मालिका असल्याने कोणती मालिका 'टीआरपी'च्या रेस मध्ये सर्वात वर आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. गेली काही महीने 'स्टार प्रवाह' वाहिनी यामध्ये सर्वात पुढे आहे तर गेली काही दिवस याच वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका सर्वाधिक टीआरपी मिळवणारी मालिका ठरत आहे. विशेष म्हणजे याही आठवड्यात या मालिकेने नंबर 1 टीआरपीची जादू कायम ठेवली आहे.
(rang maza vegla topped in trp star pravah marathi serial trp update)
सध्या नवनवीन मालिका आणि नवनवीन संकल्पना मराठी मालिका जगतात येत आहेत. त्यात सध्या गेली दोन महीने बिग बॉस सारखा अति रंजक आणि बिग बजेट शोही सुरू आहे. पण या सर्वांवर एक पाऊल सरशी करत पुन्हा एका स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' हिच मालिका अग्रणी ठरली आहे. या मालिकेने पहिला क्रमांक पटकावलाच पण पाहिल्या पाच मालिकांमध्येही स्टार प्रवाहच्याच मालिका आहेत.
नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत,हे समोर आले आहे. टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वरील 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे. तर वाहिनीवरील मालिका पहिल्या पाच क्रमांकवर आहेत. त्यापैकी 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेला 6.6 रेटिंग, 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेला 6.4 रेटिंग, 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेला 6.4 रेटिंग आणि 'आई कुठे काय करते' या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे.
विशेष म्हणजे पाहिल्या पाच नाही तर पाहिल्या दहाही क्रमांकावर 'स्टार प्रवाहच्या'च मालिका आहेत. त्यापैकी सहाव्या क्रमांकावर 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका आहे. जिला 5.8 रेटिंग मिळाले आहे. तर 'आता होऊ दे धिंगाणा' या मालिकेला 5.5 रेटिंग, स्वाभिमान' या मालिकेला 4.8 रेटिंग, 'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेला 4.7 रेटिंग तर दहाव्या क्रमांकावर 'अबोली' या मालिकेला 4.5 रेटिंग मिळाले आहे.
टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या तेरा मालिका या 'स्टार प्रवाह'च्या आहेत. त्यानंतर झी मराठीची 'नवा गडी नवं राज्य' आणि 'दार उघडे बये' या मालिका तेराव्या - चौदाव्या क्रमांकावर आहेत. 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या दहात होती. पण गेल्या काही दिवसात बदललेलं कथानक आणि मालिकेची वेळ बदलल्यामुळे या मालिकेचा टिआरपी घसरला आहे. या मालिकेला फक्त 1.7 रेटिंग मिळाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.