रानू मंडलच गाण पुन्हा व्हायरल; प्रसिद्धीसाठी असाही वापर

ranu mandal
ranu mandalranu mandal

रानू मंडल तुम्हाला आठवते का? तुमचे उत्तर होच असणार आहे. एक भीक मागणारी महिला आपल्या गाण्यामुळे इतकी प्रसिद्ध झाली की तिला गायक हिमेश रेशमीया याने गाण गाण्याची संधी दिली. यामुळे ती अधिकच प्रसिद्ध झाली. मात्र, अल्पावधीतच ती पुन्हा गायब झाली. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळीही ती आपल्या गाण्यामुळे. तिने छठ पूजेचे लोकगीत गायले असून, इंटरनेटवर चांगलेच व्हायरल होत आहे.

बिहारमध्ये छठपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बिहारी नागरिकांसाठी छठपूजा दिवाळीपेक्षासाठी मोठा सण असतो. झारखंडसह पूर्व उत्तर प्रदेशातही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यामुळे तिथे छठपूजेची तयारी सुरू झाली आहे. छठ पूजा करताना सूर्यदेवाची पूजा केली जाते. तसेच षष्ठी मातेची पूजा केली जाते. दरवर्षी भोजपुरी छठपूजेच्या निमित्ताने सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक नवीन गाणी गाताना दिसतात.

ranu mandal
माझे नाव एवढे घेतले जाते की २४ तासांपैकी २ तास उचक्या लागतात

यामुळे यावर्षीही अक्षरा सिंग, शारदा सिन्हा, खेसारी लाल यादव यासारखे भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार आणि पवन सिंग छठची नवीन गाणी गाताना दिसत आहे. त्यांचे गाणे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध होत आहेत. अशातच रानू मंडल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रानू मंडलने ‘अपना छठ’चे गाणे यूट्यूबवर रिलीज केले आहे. रानू मंडलचे हे गाण सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर या गाण्यात रानू मंडलने सूर्याला अर्घ देताना दिसत आहे.

रानू मंडलचा वापर

नागरिकांनी रानू मंडलचे हे गाण पाहतानाच त्यांना कोणत्याही प्रकारचा आवाज ऐकू आला नाही. तेव्हा नागरिकांनी लाईक्स आणि कमेंटसाठी रानू मंडलचा वापर करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. आता रानू मंडळ परत येणार नाही, असेही एकाने लिहिले आहे. हा व्हिडिओ वरदान म्युझिक वर्ल्डने यूट्यूबवर अपलोड केला आहे.

ranu mandal
शवगृहात १०० मृत महिलांशी शारीरिक संबंध; बनवले व्हिडिओ

व्हिडिओ प्रचंड शेअर

यूट्यूबवर चॅनलवर व्हिडिओ अपलोड करून रानू मंडल छठपूजेचे गाणे गात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रानू मंडलला पाहून लोकांनी व्हिडिओ ओपन करून बघितला. तसेच रानू मंडलचा हा व्हिडिओ प्रचंड शेअर केला गेला. यूट्यूबवर ९०,००० पेक्षा जास्त वेळा हे गाण बघितले गेले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com