रणवीर-दीपिकाने दत्तक घेतले मुल (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

रणवीर-दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात मुलाला कुरवाळत दीपिका म्हणतेय की, 'हा डिनर करेल, व्यवस्थित झोपेल, नाश्ता करेल आणि लू करेल याची आम्ही काळजी घेतो.' 

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण या कपलने फॅन्ससाठी नुकतीच एक खुशखबर दिली आहे. ती म्हणजे या हॉट कपलने एका मुलाला दत्तक घेतले आहे. या दोघांचा मुलासोबतचा एक व्हिडीओ देखील नुकताच सोशल मिडीया व्हायरल होत आहे.

सध्या रणवीर-दीपिका लंडनमध्ये आहेत आणि तिथे त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले आहे. या दोघांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात मुलाला कुरवाळत दीपिका म्हणतेय की, 'हा डिनर करेल, व्यवस्थित झोपेल, नाश्ता करेल आणि लू करेल याची आम्ही काळजी घेतो.' 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

ज्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले आहे, तो आपल्या चांगलाच परिचयाचा आहे! हा मुलगा दुसरा-तिसरा कुणी नसून बॉलिवूडमधील अभिनेता वरूण धवन आहे. वरूण धवनदेखील सध्या लंडनमध्ये आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात रणवीर-दीपिका दिसत आहेत. या व्हिडिओत वरूण धवन बोलतोय की, 'लंडनमध्ये मी मला ज्यांनी दत्तक घेतले आहे त्या पालकांसोबत आहे आणि ते माझ्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहेत.' त्यावर दीपिका म्हणतेय की, 'हा डिनर करेल, व्यवस्थित झोपेल, नाश्ता करेल आणि लू करेल याची आम्ही काळजी घेतो.' 

वरूण 'कलंक' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर लंडनकडे रवाना झाला. तिथे त्याला रणवीर व दीपिका भेटले आणि त्यांनी हा विनोदी व्हिडिओ बनवला आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh and deepika padukone adopted a child in London