दीप-वीरची 'रामलीला' अखेर साक्षात !

दीप-वीरची 'रामलीला' अखेर साक्षात !

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा विवाहसोहळा आज (बुधवार) पार पडला. त्यांचा हा विवाह पारंपरिक कोंकणी पद्धतीने संपन्न झाला असून, इटलीतील लेक कोमो येथे हा सोहळा पार पडला. या विवाहसोहळ्याला काही आमंत्रित लोकांचीच उपस्थिती होती.  

रणवीर आणि दीपिका या दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चा गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सुरु होत्या. त्यानंतर आज हे दोघे विवाहबंधनात अडकले. त्यांचा हा विवाहसोहळा लेक कोमो येथील एका व्हिलामध्ये पार पडला. तसेच त्यांच्या लग्नातील विधींची सुरवात गेल्या दोन दिवसांपासून चालू होती. त्यानंतर काल (मंगळवार) कोंकणी पद्धतीनेच रणवीर-दीपिकाचा साखरपुडा झाला. आज झालेला हा विवाहसोहळा अत्यंत कडक सुरक्षाव्यवस्थेत संपन्न झाला.

दरम्यान, या दोघांचा विवाह आज कोंकणी पद्धतीने पार पडला. त्यानंतर आता उद्या (गुरुवार) सिंधी पद्धतीने त्यांचा विवाह होणार आहे. तसेच 28 नोव्हेंबरला मुंबईतील ग्रँट हयात या आलिशान ठिकाणी दीप-वीरची रिसेप्शन पार्टी असणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com