Ranveer Singh: न्यूड फोटोशुटमधील फोटोंची झालीय छेडछाड, रणवीरचा पोलिसांना जबाब

न्युड फोटो रणवीरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अपलोड झाले नसल्याचा दावा त्याने केलाय
Ranveer Singh Nude Photoshoot
Ranveer Singh Nude Photoshoot esakal
Updated on

Ranveer Singh Nude Photoshoot: रणवीर सिंग बोल्ड फोटोशुटप्रकरणी सोशल मीडियासह समाजातही मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली होती. त्याच्या बोल्ड फोटोजला समाजातील सर्वच स्तरांतून विरोध करण्यात आला होता. मात्र आता रणवीरने मुंबई पोलीसांना दिलेल्या जबाबात त्याच्या फोटोंसह छेडछाड झाल्याचा दावा त्याने केलाय. हा दावा खरा ठरल्यास त्याच्यावर करण्यात आलेले सर्व गुन्हे खोटे ठरत त्याला क्लिन चीट मिळेल.

रणवीरवर चालू असलेल्या न्युड फोटोशुटप्रकरणी २६ जुलैला अश्लील प्रदर्शनप्रकरणात त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली होती. मात्र व्हायरल होत असलेले न्युड फोटो रणवीरच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून अपलोड झाले नसल्याचे आता त्याने म्हटले आहे. रणवीरकडून २९ ऑगस्टला मुंबई पोलीसांत याबाबत जबाब नोंदवण्यात आलाय. दिलेल्या जबाबात रणवीरने असा दावा केलाय की, व्हायरल झालेले फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आले नव्हते.

तसेच ज्या न्यूयॉर्कच्या मॅक्झिनसाठी हा फोटोशुट करण्यात आला होता तो फोटो त्याच्या इंन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोजपैकी नाही. व्हायरल झालेल्या फोटोसह काहीतरी छेडछाड करण्यात आल्याचा दावा त्याने केलाय. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये त्याच्या गुप्तांगाचा भाग दिसत असल्यानेच त्याच्यावर मुंबई पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी व्हायरल झालेल्या फोटोला फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवले असून हा फोटो मॉर्फ आहे की नाही याचा तपास करण्यात येईल. या फोटोसह छेडछाड झाल्याची बाब पुढे आल्यास रणवीरला या प्रकरणात क्लिन चीट मिळण्याची शक्यता आहे. जे सात फोटो रणवीरने त्याच्या इन्स्टा हँडलवर शेअर केले आहेत ते अश्लील नसून त्यात त्याने अंडरवियर घातली असल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलंय. तसेच ज्या फोटोमुळे रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्याचा समावेश इन्स्टावरून शेअर झालेल्या फोटोजमध्ये नव्हता. पोलीसांनी यावेळी रणवीरच्या इन्स्टा फोटोजचाही तपास केला, ज्यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या फोटोचा समावेश नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com