Ranveer Singh Video: या अभिनेत्यासाठी रणवीर फाडफाड मराठी बोलला! चाहते खुश

रणवीर सिंगबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आपल्या तऱ्हेवाईक स्टाईलमुळे तो नेहमीच चर्चेत असतो.
Ranveer Singh Video
Ranveer Singh Videoesakal

Ranveer Singh Bollywood Actor share video : रणवीर सिंगबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आपल्या तऱ्हेवाईक स्टाईलमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. बाकी काही असलं तरी रणवीरचा उत्साह, त्याची मेहनत आणि सहकलाकारांप्रती त्याचं वागणं हे नेहमीच चाहत्यांना भावतं. प्रसिद्ध मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि रणवीर सिंग यांची मैत्री ही सर्वश्रृत आहे. सिद्धार्थनं शेयर केलेला तो व्हिडिओ लक्ष वेधून घेतो आहे.

सिद्धार्थचा बालभारती नावाचा मराठी चित्रपट आजपासून मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. त्याच्या प्रमोशनच्या निमित्तानं सिद्धार्थनं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. आज सिद्धार्थनं त्याच्या इंस्टावरुन एक खास व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये त्यानं बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंगचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेयर केला आहे. रणवीरनं त्यामध्ये फाडफाड मराठी बोलत नेटकऱ्यांना जिंकून घेतलं आहे.

रणवीर त्या व्हिडिओमध्ये म्हणतो, मी सिद्धार्थच्या बालभारतीचा ट्रेलर पाहिला. सिद्धार्थ हा गुणी कलाकार आहे. त्याचा बालभारती हा चित्रपट दोन डिसेंबर पासून प्रदर्शित होतो आहे. दादा के जलवे....दादा आय़ लव यु म्हणून... रणवीरनं सिद्धार्थच्या या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी देखील रणवीरचं मनापासून कौतूक केलं आहे. एकानं तर सिद्धार्थनं आणखी एका सेलिब्रेटीला मराठी बोलायला लावलं. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा - आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

स्फियरओरिजीन्स यांची निर्मिती आणि नितीन नंदन यांचे दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटामध्ये पालकांना त्यांच्या मुलांसाठी सर्वात जास्त काय हवे आहे. तर उत्तम शिक्षण.हीच कळकळ या चित्रपटामध्ये मांडण्यात आली आहे. चित्रपटामध्ये आर्यन मेंघजी, सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com