रणवीर होणार गुजराती 'भाई'!

Monday, 27 May 2019

अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपटात एका गुजराती व्यक्तिरेखेत दिसेल. यशराज फिल्म्सच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात रणवीर गुजराती जयेशभाईची मुख्य भूमिका साकारणार आहे.

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आगामी चित्रपटात एका गुजराती व्यक्तिरेखेत दिसेल. यशराज फिल्म्सच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात रणवीर गुजराती जयेशभाईची मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्मा करणार असून दिग्दर्शन दिव्यांग ठक्कर करणार आहेत.

वेगवेगळ्या भूमिकांसाठी रणवीस नेहमीच सज्ज असतो. 'जयेशभाई जोरदार'मध्ये तो एका विनोदी गुजराती व्यक्तीच्या भूमिकेत दिसेल. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी या चित्रपटाबाबतचे ट्विट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer Singh plays Gujarati roll in Jayeshbhai Jordar hindi movie