सेल्फ क्वारंटाईन दरम्यान अशी झाली रणवीर सिंगची हालत की बघून हैराण व्हाल..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

अभिनेता रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केलाय..सोशल मिडियामध्ये रणवीरचा हा फोटो धुमाकुळ घालत आहे..

मुंबई-  कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे..चीनमधून पसरलेला हा व्हायरस अनेक देशात जागतिक संकट निर्माण करतोय..भारतात देखील या व्हायरसने संकट निर्माण केलंय..भारतात कोरोना बाधितांची संख्या आता वाढून ३६९ एवढी झाली आहे..आणि यामुळे मृत पावलेल्यांची संख्याही वाढून ८ पर्यंत पोहोचली आहे..याच संकटापासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यु घोषित केला होता..सर्व सामान्य माणसापासून ते बॉलीवूडच्या सेलिब्रिटींपर्यंत सगळेच या व्हायरसपासून वाचण्यासाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत..सर्वजण घरात राहुन स्वतःला या व्हायरसपासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत..

हे ही वाचा: जीम बंद! घरच्या घरी रहा फिट, साराचा फिटनेस व्हिडिओ व्हायरल

यातंच बॉलीवूडचं हॉट कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण काही दिवसांपासून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत..याचदरम्यान अभिनेता रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केलाय..सोशल मिडियामध्ये रणवीरचा हा फोटो धुमाकुळ घालत आहे..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Me coming out of quarantine

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

खरं तर सध्या सगळेचजण हे सोशल मिडियावर कोरोना व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी अनेक सल्ले देताना पाहायला मिळतात..त्यात काहीजण असे देखील आहेत जे या संसर्गाला घाबरलेल्या लोकांचा मूड बदलण्यासाठी हटके प्रयत्न करत आहेत..असंच काहीसं रणवीर सिंगनेसुद्धा केलं आहे..नेहमीच हटके काहीतरी करण्यासाठी रणवीर ओळखला जातो..आणि आता तर रणवीरने त्याच्या चाहत्यांसाठी इंस्टावर असा फोटो शेअर केला आहे ज्यात रणवीर एकदम खतरनाक दिसतोय.हा फोटो पोस्ट करत रणवीरने म्हटलंय, क्वारंटाईंन नंतरचा माझा लूक..रणवीरचा हा फोटो पाहून आणि कॅप्शन वाचून त्याचे चाहते लोटपोट होत आहेत..

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Double the Endorphin rush when She’s around! #homegymbuddies my #mondaymotivation @deepikapadukone

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

नेहमीच आपल्या कामात व्यस्त असणारे बॉलीवूड सेलिब्रिटी सेल्फ क्वारंटाईनमध्ये कंटाळलेले पाहायला मिळत आहेत..२२ मार्चला जनता कर्फ्युच्या दिवशी रणवीरने पत्नी दीपिकासोबत कोरोना योद्धांसाठी बाल्कनीमध्ये येऊन टाळ्या वाजवल्या..यादरम्यान दीपिका घंटानाद करताना देखील दिसून आली..सिनेमाबाबत सांगायचं झालं तर रणवीर दीपिका स्टारर ८३ हा सिनेमा १० एप्रिलला रिलीज होणार होता मात्र कोरोना व्हायरसचं संकट लक्षात घेता सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे..

ranveer singh will look like this after salf quarantine  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranveer singh will look like this after salf quarantine