जीम बंद! घरी राहुनही असे रहा फिट, सारा अली खानचा फिटनेस व्हिडिओ व्हायरल..

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 मार्च 2020

जीम बंद असलं म्हणून काय झालं अनेक फिटनेस फ्रिक त्यांचं वर्कआऊट थांबवू शकत नाही..मग यात बॉलीवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील..म्हणूनंच अभिनेत्री सारा अली खानने एक व्हिडिओ पोस्ट केलाय.

मुंबई- देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता सरकारने सर्व नागरिकांना घरीच थांबण्याचे आदेश दिले आहेत..यासाठी सरकारने सर्व सार्वजनिक सेवा देखील बंद केल्या आहेत..यात जीमचा देखील समावेश होतो..मात्र जीम बंद असलं म्हणून काय झालं अनेक फिटनेस फ्रिक त्यांचं वर्कआऊट थांबवू शकत नाही..मग यात बॉलीवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील..म्हणूनंच अभिनेत्री सारा अली खानने एक व्हिडिओ पोस्ट केलाय..ज्यात सारा घरच्या घरीच वर्कआऊट करताना दिसतेय..

वाचा : जनता कर्फ्युच्या दिवशी पंतप्रधानांनी केलं 'या' महिलेचं कौतुक

साराने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, 'सरकारने जाहीर केलेल्या निर्णयाचं मी समर्थन करत आहे..मात्र हे करताना मी माझं वर्कआऊट थांबवू शकत नाही' आणि म्हणूनंच साराने तिचा हा फिटनेस व्हिडिओ तिच्या चाहत्यांसाठी शेअर केलाय...हा व्हिडिओ तीन मिनिटांचा आहे..यामध्ये ती फूल बॉडी वर्कआऊटबाबत चांगल्या टीप्स देखील देत आहे.साराचा हा व्हिडिओ काही क्षणातंच चांगला व्हायरल झाला.

साराने हा व्हिडिओ पोस्ट करुन २४ तास देखील उलटले नाहीत इतक्या कमी वेळात या व्हिडिओला ४० लाख व्ह्युज मिळाले आहेत..जर तुम्हीही कोरोना व्हायरसमुळे सध्या घरात असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हीही घरच्या घरी वर्कआऊट करुन फिट राहू शकता..

काही दिवसांपूर्वीच सारा अली खान  तिची आई अमृता सिंग सोबत बनारसमध्ये होती...बनारसमध्ये या दोघींनी काशी विश्वनाथांचे दर्शन घेतले..ज्यावरुन वाद झाले..यादरम्यान त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरातील गाभा-यात जाऊन शिव शंकराचे दर्शन घेतले आणि पूजा केली...यांच्या या पूजेवरुन काशी विद्वत परिषदने नाराजी व्यक्त केली होती..मात्र या तक्रारीनंतर लगेचच मंदिर प्रशासनाने त्यांची प्रतिक्रिया दिली...साराने मंदिराच्या गाभा-यात जाऊन दर्शन घेतले नसल्याचं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलंय..

sara ali khan keeping her self fit with this quick workout session


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sara ali khan keeping her self fit with this quick workout session