sanjay dutt news on bollywood
sanjay dutt news on bollywood esakal

टॉलीवूडपुढे बॉलीवूड का होतंय 'फुस्स'?, संजय दत्तनं दिलं उत्तर

बॉलीवूड सध्या कोमात गेलेलं दिसतंय. याचे कारण एकापेक्षा एक सरस टॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

Bollywood News: बॉलीवूड सध्या कोमात गेलेलं दिसतंय. याचे कारण एकापेक्षा एक सरस टॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. कोरोनाच्या काळात देखील (Tollywood News) टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. थलापती विजयचा मास्टर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच (Bollywood Movies) दरम्यान धनुषचा अथिरन, असुरन नावाचे चित्रपट प्रदर्शित (Dhanush Athiran And Asuran Movie) झाले होते. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून टॉलीवूडच्या चित्रपटांनी धुमाकूळ घातला आहे. त्याचा मोठा धसका बॉलीवूडच्या चित्रपटांनी घेतल्याचे (KGF 2 Movie) दिसून आले आहे. गेल्या वर्षी अल्लु अर्जुनचा पुष्पा नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानं तीनशे कोटींहून अधिक कमाई केली. त्यानंतर एस एस राजामौली यांचा आरआरआर (RRR Movie) चित्रपट आला त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्याचे दिसून आले होते.

आता तर यशच्या केजीएफच्या चॅप्टर दोननं तर प्रेक्षकांना वेड लावले आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट तुफान चालला आहे. त्याला बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत बॉलीवूडचे स्टार अभिनेते हेच टॉलीवूडच्या चित्रपटांचे प्रमोशन करताना दिसत आहेत. त्यामध्ये उल्लेख करायचा झाल्यास सलमान खान, आमीर खान यांचे नाव घ्यावे लागेल. सलमान खाननं आरआरआरच्या एका प्रमोशन कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. त्यामध्ये त्यानं सध्या टॉलीवूडच्या चित्रपटांना बॉलीवूडच्या प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना (KGF Chapter 2 Breaks Baahubali Records) दिसत असून बॉलीवूडच्या निर्मात्यांनी त्यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. दिवसेंदिवस बॉलीवूडमधील हिरोइझम संपत चालल्याची खंत सलमाननं यावेळी व्यक्त केली होती.

बॉलीवूडला जर पुन्हा जोरदार कमबॅक करायचे असल्यास तर त्यांना पुन्हा पूर्वीचा हिरोइझम प्रेक्षकांपुढे मांडावा लागेल. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि केजीएफमध्ये प्रमुख भूमिका साकारलेल्या संजय दत्तनं टॉलीवूडच्या वाढत चाललेल्या प्रभावाविषयी आणि बॉलीवूडच्या घसरणाऱ्या दर्जावर भाष्य केले आहे. संजय दत्तनं केजीएफ 2 मध्ये गरुडाचा भाऊ अधीराची भूमिका साकारली असून (Sanjay Dutt as Adeera as KGF Chapter 2) त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. संजय दत्तनं एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मला वाटतं बॉलीवूड आता आपल्या हिरोइझमपासून दूर चाललं आहे. त्यानं आता दमदारपणे पुनरागमन करण्याची गरज आहे. दुसरीकडे साऊथ इंडस्ट्रीनं आपली ओळख काही विसरलेली नाही. त्यांच्याकडे हिरोइझमशी संबंधित चित्रपट तयार होण्याचे प्रमाण मोठे आहे. आपल्याककडे तसे नाही. वेगवेगळ्या विषयांवर जरी आपण चित्रपट तयार केले असले तरी ते प्रभावीपणे पोहचवण्यात निर्माते आणि दिग्दर्शक कमी पडत आहेत.

sanjay dutt news on bollywood
Beast Box Office: विजयच्या Beast नं KGF 2 पुढे टेकले गुडघे, रॉकीचा जाळ

आपले दिग्दर्शक हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान मधील प्रेक्षकांना विसरले आहे. असे वाटते. जो सगळ्यात मोठा आपला प्रेक्षकवर्ग आहे. त्यालाच विसरल्यानं त्याचा मोठा फटका बॉलीवूडला बसला आहे. मला असे वाटते अशी परिस्थिती ही काही कायम राहणारी नाही. मात्र त्यातून तातडीनं पर्याय शोधणे गरजेचे आहे. असेही संजय दत्तनं यावेळी सांगितले.

sanjay dutt news on bollywood
KGF 2: चित्रपट पाहिल्यावर अंगात शिरला 'रॉकी भाई' थिएटरमध्ये तोडफोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com