रणवीरचा नवा चित्रपट ‘बैजू बावरा’ लवकरच प्रेक्षकांसमोर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑक्टोबर 2019

अभिनेता रणवीर सिंगच्या भूमिका संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतून नेहमीच गाजल्या आहेत.

दिल्ली : अभिनेता रणवीर सिंगच्या भूमिका संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतून नेहमीच गाजल्या आहेत. आता पुन्हा एकदा भन्साळींच्या  ‘बैजू बावरा’ या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

हा चित्रपट म्युझिकल ड्रॉमा असून, रणवीर एका रोमॅंटिक गायकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आणखी कोणते कलाकार दिसणार आहेत, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. 

wen title : Ranveer's new movie 'Baiju Bawra' will soon be in the audience


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ranveer's new movie 'Baiju Bawra' will soon be in the audience