'सिम्बा 2' मध्ये माझ्याशिवाय आणखी कोण? Ranveer Singh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranveer Singh

'सिम्बा 2' मध्ये माझ्याशिवाय आणखी कोण?

रोहित शेट्टीच्या(Rohit Shetty) सिनेमांना असलेला साऊथच्या सिनेमांचा टच बॉलीवूडच्या सिनेप्रेमींसाठी मोठी मेजवानी ठरते. सिनेमात फायटिंगच्या नावाखाली गाड्या उडवण्याचे त्याने दाखवलेले स्टंट्स पाहून थिएटरात टाळ्या,शिट्टया,आवाज घुमले नाहीत तर नवल म्हणावं लागेल. रोहित शेट्टीचे सिनेमे हे अनेकदा साऊथच्या सिनेमांचे रिमेक असतात. सिंघम हा सिनेमा देखील २०१५ च्या टेम्पर या साऊथच्या हीट सिनेमाचा रीमेक होता. बरं,त्याचे सिनेमे एका भागावर थांबत नाहीत तर त्याचे सीक्वेल ठरलेले. आता 'गोलमाल','सिंघम' सिनेमांचंच उदाहऱण घ्या नं. पण आता या सिनेमानंतर रोहित शेट्टी 'सिम्बा'चा ही सीक्वेल आणणार का यावरून रणवीर सिंगला(Ranveer Singh) छेडले असता तो काय म्हणालाय ते सविस्तर वाचा.

हेही वाचा: जुही नात्याने त्या अभिनेत्याची आंटी;पण तो तिच्या प्रेमात होता

रणवीर म्हणाला,'सिम्बा 2' करायचं ठरलंय रोहितचं. आणि 'सिम्बा' म्हणून तो पुन्हा माझाचा विचार करेल. कारण ही भूमिका माझ्या खूप जवळची आहे. रोहितला सिनेमांचे सीक्वेल करायला आवडतात. आणि त्यात त्याला यशही मिळालंय हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे नक्कीच जसे गोलमाल,सिंघम चे सीक्वेल आले तसा 'सिम्बा 2' ही येईल हे रणवीरनं आधीच सांगून टाकलं अगदी दिग्दर्शक,निर्मात्याच्या परवानगीविना. रोहित शेट्टीचा नुकताच 'सुर्यवंशी' सिनेमा प्रदर्शित झाला. ज्यामध्ये अक्षय कुमार पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत होता. रणवीर आणि अजय यांचीही या सिनेमात छोटी भूमिका होती. तसंच 'सिम्बा' सिनेमातही रोहितनं अजयला थोड्या वेळासाठी का होईन आणलं होतं सिंघमच्या रुपात. 'सिम्बा' मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अली खाननं काम केलं होतं. आता रोहितच्या आधीच रणवीरनं 'सिम्बा 2' येण्याचं जाहीर करून टाकलंय त्यामुळे आता रोहित शेट्टी यावर काय प्रतिक्रिया देतोय ये पहायचं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top