Ranvir Shorey: अभिनेता रणवीरच्या वडिलांचे निधन, शोक अनावर! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranvir Shorey news

Ranvir Shorey: अभिनेता रणवीरच्या वडिलांचे निधन, शोक अनावर!

Ranvir Shorey: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर शौरीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या वडिलांचे कृष्ण देव शौरी यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही कऱण्यात आले होते. 1970 ते 1980 दरम्यान त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत वडिलांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

जिंदा दिल, बे रहम, बद - बदनाम सारख्या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. रणवीरच्या वडिलांचे निधन होताच बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहत रणवीरचे सांत्वन केले आहे. रणवीरनं ट्विटरवर खास पोस्ट शेयर करत वडिलांना अनोख्या शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. त्यात तो म्हणतो, तुमचं जाणं हे आता नेहमीच मनाला चटका लावून जाईल. तुमची प्रेरणा सतत जाणवेल. तुम्ही जेव्हा होतात तेव्हा एक सुरक्षा कवच अवती भोवती होतं. आता ते नसेल. याचीही खंत आहेच.

तुम्ही माझे सर्वात मोठे उर्जा केंद्र होतात. तुमच्याकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचा मला माझ्या आयुष्यात उपयोगही झाला. आता तुम्ही नाहीत याची जाणीव मनाला करुन देणं अवघड आहे. रणवीरच्या त्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी देखील त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे सात्वंन केले आहे. टीव्ही निर्माता राज नायक यांनी लिहिलं आहे की, आम्हाला ही बातमी ऐकून खूप वाईट वाटले रणवीर. तू या आघातातून लवकरच बाहेर येशील.

हेही वाचा: Alia-Ranbir: 'आलिया हे शोभलं का तुला?' सगळ्यांसमोर रणबीरसोबत केलं असं काही...

कृष्ण देव शौरी हे बॉलीवूडमधील मोठे निर्माते होते. ते केडी शौरी या नावानं ओळखले जायचे. ७० आणि ८० च्या दशकांत त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी 1988 मध्ये महायुद्ध चे दिग्दर्शन केले होते. त्यात गुलशन ग्रोव्हर, कादर खान आणि परेश रावल यांच्या भूमिका होत्या.

हेही वाचा: Ranbir Trolled: 'प्रेग्नंट बायकोच्या वजनाची टिंगल करतो, लाज नाही वाटतं?'

Web Title: Ranvir Shorey Father Filmmaker Krishan Dev Alias Kd Passed Away Bollywood Celebrity Condolence

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..