रॅपर बादशाहचा घटस्फोट! दुसरं लग्न ५ महिन्यात मोडलं, सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती

Badshah Isha Rikhi Divorce रॅपर बादशाहनं पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीसोबत घटस्फोट झाल्याचं जाहीर केलंय. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली. दोघांनी मार्च २०२६मध्ये गुपचूप लग्न उरकलं होतं.
Badshah Isha Rikhi Divorce

Badshah Isha Rikhi divorce after five months of marriage

Esakal

Updated on

रॅपर बादशाह आणि पंजाबी चित्रपटात काम केलेली अभिनेत्री ईशा रिखी यांनी ५ महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न उरकलं होतं. मात्र आता दोघांनीही घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर याबाबत पोस्ट करत रॅपर बादशाहने माहिती दिलीय. लग्नानंतर दोघांमध्ये बिनसल्याचं समोर आलं होतं. सोशल मीडियावर दोघांनीही केलेल्या काही पोस्टवरून सगळं ठिक नसल्याचं म्हटलं जात होतं. आता बादशाहने पोस्ट शेअर करत घटस्फोट झाल्याचं जाहीर केलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com