गोल्डन ग्लोब विजेती अभिनेत्री रॅक्वेल वेल्च काळाच्या पडद्याआड|Raquel Welch Death | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raquel Welch Death

Raquel Welch Death : गोल्डन ग्लोब विजेती अभिनेत्री रॅक्वेल वेल्च काळाच्या पडद्याआड

Raquel Welch Death hollywood actress : हॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे १९६० च्या दशकांत आपल्या अभिनय आणि सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री रॅक्वेल वेल्च यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहिली आहे.

वयाच्या ८२ व्या वर्षी रॅक्वेल यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. केवळ हॉलीवूडच नव्हे तर जगभरामध्ये आपल्या सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या रॅक्वेल यांचा चाहतावर्ग मोठा होता. मादक सौंदर्य आणि बोल्डनेस अदा यांच्यामुळे रॅक्वेल यांची नेहमीच आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा होत राहिली. रॅक्वेल या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करण्यात आले होते. हॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

Also Read - नेट बँकिंग सुविधा वापरताय? मग हे नक्कीच वाचा...

गेल्या ५० वर्षांपासून रॅक्वेल यांनी हॉलीवूडसाठी योगदान दिले. त्यांचा चाहतवर्गही मोठा होता. रॅक्वेल यांचे मॅनेजर स्टीव साउएर यांनी रॅक्वेल यांच्या निधनाविषयी माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. रॅक्वेल यांनी त्यांच्या पाच दशकांच्या प्रदीर्घ कालावधीत ३० चित्रपट आणि ५० टीव्ही शोमध्ये काम केले. याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये कॅमियो देखील केले.

आपल्या बोल्डनेसमुळे ओळखल्या जाणाऱ्या रॅक्वेल यांना गोल्डन ग्लोब पुरस्कारानं देखील गौरविण्यात आले होते. रॅक्वेल यांच्या कुटूंबियांविषयी सांगायचे झाल्यास त्यांना दोन मुलं असून त्यांची नावं डेमन वेल्च आणि टहनी वेल्च असे आहे. १९६० मध्ये रॅक्वेल यांनी हॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. रॅक्वेल यांच्या अभिनयाचा चाहतावर्ग मोठा होता. त्यांच्या जाण्यानं हॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.