Rashmi Desai: अभिनेत्रीला सुर्यग्रहण पाहणं पडलं महागात! 'आईनं तर...' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rashmi Desai

Rashmi Desai: अभिनेत्रीला सुर्यग्रहण पाहणं पडलं महागात! 'आईनं तर...'

Rashmi Desai Solar Eclipse story: यंदाच्या दीपोत्सवावर सुर्यग्रहणाचे सावट आहे. आज भारताच्या वेगवेगळ्या भागातून सुर्यग्रहण दिसणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यासगळयात सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट देखील व्हायरल झाल्या आहेत. खासकरुन ग्रहणकाळात काय काळजी घ्यायला हवी. प्रेग्नंट महिलांनी काय करावे, याप्रकारच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अशातच टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाईनं सुर्यग्रहणाबाबत एक आठवण सांगितली आहे. ती व्हायरल झाली आहे. नेटकऱ्यांचा त्या पोस्टला मोठा प्रतिसादही मिळाला आहे. अभिनेत्रीनं आपण जेव्हा सुर्यग्रहण पाहण्याचा आग्रह केला तेव्हा कुटूंबियांकडून कशाप्रकारे ओरडा खाल्ला हे सांगितलं आहे. अमर उजालाच्या बॉलीवूड गॉसिप्स नावाच्या सदरात रश्मीनं याविषयी सांगितलं असून नेटकऱ्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. रश्मीला सुर्यग्रहण पाहणं महागात पडलं होतं.

रश्मीनं सांगितलं आहे की, ही साधारण दोन वर्षांपूर्वीच गोष्ट आहे. त्यावेळी मोठं सुर्यग्रहण होतं. त्या खगोलशास्रीय गोष्टीची साक्षीदार होण्याची माझी इच्छा होती. म्हणून मला ते ग्रहण पाहायचंही होतं. मात्र यासगळ्यात कुटूंबियांकडुन मला रोखण्यात आलं. त्यांनी निक्षुन सांगितलं की, काहीही झालं तरी तू ग्रहण पाहायचं नाही. मी मात्र सुर्यग्रहण पाहिलं आणि मला आईचा खूप ओरडा खावा लागला होता. ती तर माझ्यावर खूप रागावली होती.

हेही वाचा: Virat Kohli: IAS अधिकारी म्हणतो, कोहलीनं ५ गोष्टी शिकवल्या!

मी खिडकीतून चोरुन ते सुर्यग्रहण पाहत होते. तेवढ्यात आई तिथे आली. तिनं मला पाहिल्यानंतर जो आकांडतांडव केला तो मी कधीही विसरणार नाही. आईनं लगेच खिडकीचा पडदा ओढून घेतला आणि मला दुसऱ्या खोलीत ती घेऊन गेली. मला काही झालं तरी सुर्यग्रहण पाहता येणार नाही. असे तिनं सांगितलं होतं. रश्मीनं तिचा हा किस्सा फेसबूकवर देखील शेयर केला आहे.

हेही वाचा: Virat Kohli: 'विराट नावाचा एलियन आला, त्यानं...' आजी- माजी पाकिस्तानी क्रिकेटर बोललेच!