esakal | Video Viral; 'रश्मि रॉकेट' तापसी म्हणते, 'जिंदगी तेरे नाम'
sakal

बोलून बातमी शोधा

Video Viral; 'रश्मि रॉकेट' तापसी म्हणते, 'जिंदगी तेरे नाम'

Video Viral; 'रश्मि रॉकेट' तापसी म्हणते, 'जिंदगी तेरे नाम'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू ही तिच्या हटके अभिनयासाठी ओळखली जाते. आतापर्यत तिनं वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये केलेल्या अभिनयाचं प्रेक्षकांनी कौतूक केलं आहे. सध्या तिच्या झी5 ओरिजिनल प्रस्तुत 'रश्मी रॉकेट' चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. 15 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटातील एक गाणं रिलिज झालं आहे. त्या गाण्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन आले आहे. 'जिंदगी तेरे नाम' लाँच केले आहे ज्यात तापसी पन्नू आणि प्रियांशु पैन्युली दिसत आहेत. 'जिंदगी तेरे नाम' ही आगळी वेगळी रचना असून चाहत्यांना ती भावली आहे. या गाण्याला अमित त्रिवेदी यांनी संगीत आणि आवाज दिला आहे.

अमित त्रिवेदीच्या चाहत्यांसाठी हे गाणं आगळी वेगळी ट्रीट ठरणार आहे. कौसर मुनीर यांनी लिहिलेल्या गीतांसह अमित त्रिवेदीच्या आवाजानं वेगळी रंगत आणली आहे. 'जिंदगी तेरे नाम' त्या सर्व जोडप्यांना समर्पित आहे जे अपयशातून जाताना देखील एकत्रितपणे सर्व आव्हानांना सामोरे जातात. हे गाणे रश्मी (तापसीने साकारलेले) वर सुंदरपणे चित्रित केले आहे, ती तिच्या व्यावसायिक जीवनात कठीण काळातून जात आहे, ज्याचा परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील होतो आहे.

हेही वाचा: तू बोल्ड सीन्सबद्दल प्रियकराला आधी सांगतेस का? तापसी म्हणाली...

हेही वाचा: तापसी पन्नूची मोठी घोषणा; सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

तापसी पन्नूनं आपल्या सोशल मीडिया हँडलवर गाणे शेयर एक पोस्टही शेयर केली आहे. त्यात तिनं तुम्ही जर साथ सोडली तर यापुढील प्रवास कसा असेल असं लिहिलं आहे. रोनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडड़िया यांच्याद्वारे निर्मित, 'रश्मी रॉकेट' नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लों द्वारा लिखीत आहे. यामध्ये सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. 'रश्मि रॉकेट' 15 ऑक्टोबरला झी5 वर प्रदर्शित होणार आहे.

loading image
go to top