Rashmika Mandanna : नॅशनल क्रश 'रश्मिका'ला मिळाली आंतरराष्ट्रीय ओळख, 'फोर्ब्स'च्या यादीत चमकली!

रश्मिका शिवाय(Rashmika Mandanna in Forbes India 30 list) बॉलीवूडमधील इतर अनेक सेलिब्रेटींही या यादीमध्ये झळकल्याचे दिसून आले आहे.
South Actress Rashmika Mandanna
South Actress Rashmika Mandanna esakal

Rashmika Mandanna in Forbes : साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. (Rashmika Latest News) तिचं दिसणं, तिची भूमिका अन् तिचा डान्स हे सारं प्रेक्षकांच्या, चाहत्यांच्या कौतुकाचा विषय असल्याचे दिसून आले आहे. अशातच रश्मिकाच्या नावावर आणखी एका वेगळ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

नॅशनल क्रश म्हणून रश्मिकाचे नाव गेल्या काही वर्षापासून घेतले जात (Latest Bollywood News) आहे. खरं तर रश्मिका ही बऱ्याच वर्षांपासून चित्रपट विश्वात कार्यरत आहे. मात्र जेव्हा तिचा अल्लू अर्जुनसोबतचा पुष्पा द राईज नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हापासून ती प्रसिद्धीच्या झोतात आल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर संदीप वांगा रेड्डीच्या अॅनिमल (Rashmika In Animal Movie) चित्रपटामधून तिनं मोठी लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले आहे.

आता रश्मिकानं इंटरनॅशनल पातळीवर आपल्या नावाची वेगळी मोहोर (Rashmika Mandanna Forbes List) उमटविल्याचे दिसून आले आहे. तिला या वर्षीच्या फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी देशातील कित्येक सेलिब्रेटींचा त्या यादीत समावेश करण्यात आला होता. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली या खेळाडुंची नावं आहेत. फोर्ब्स दरवर्षी ३० सेलिब्रेटींची नाव जाहीर करते. ती वेगवेगळ्या क्षेत्रातील नावं असल्याचे दिसून आले आहे.

फोर्ब्सच्या यादीत अशा युवकांच्या नावाची निवड केली जाते ज्यांचे वय हे (Rashmika Latest Marathi News) ३० वर्षांपेक्षा कमी आहे. त्या वयात मोठी कामगिरी करणाऱ्या सेलिब्रेटींचा समावेश त्या यादीमध्ये केला जातो. या यादीमध्ये रश्मिकाच्या नावाची वर्णी लागल्यानं चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

South Actress Rashmika Mandanna
Kangana Ranaut: 'जर का मला...' राजकारणात येण्यावर कंगनानं दिली मोठी प्रतिक्रिया!

रश्मिकाशिवाय इतर अनेक सेलिब्रेटींची नावं या यादीमध्ये समाविष्ट आहेत. त्यात राधिका मदान, संगीत क्षेत्रातील अदिती सैगल यांच्या नावाचा समावेश त्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com