'नवे कलाकार म्हणजे तीन महिन्यांच्या बाळासारखे', त्यांना अजून... |Ratna Pathak Shah | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ratna Pathak Shah

Ratna Pathak Shah : 'नवे कलाकार म्हणजे तीन महिन्यांच्या बाळासारखे', त्यांना अजून...

Ratna Pathak Shah Comment on bollywood : बॉलीवूडमध्ये असे काही सेलिब्रेटी आहेत जे त्यांच्या अभिनयाबरोबरच परखड व्यक्तिमत्वाबद्दल ओळखले जातात. यात प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्धीन शहा यांच्या पत्नी आणि लोकप्रिय अभिनेत्री रत्ना पाठक शहा यांचे नाव घ्यावे लागेल. सध्या त्यांची हॅप्पी फॅमिली नावाची एक मालिका चर्चेत आहे.

रत्ना पाठक शहा यांनी त्यांच्या नव्या मालिकेच्या प्रमोशनच्या निमित्तानं केलेल्या एका विधानाची जोरदार चर्चा आहे. त्यांनी सध्याचे नवीन कलाकार, त्यांच्या भूमिका आणि त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी परखड वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर देखील त्या वक्तव्यावरुन चाहत्यांनी रत्ना पाठक शहा यांच्यावर वेगवेगळया प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Also Read - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

गेल्या काही दिवसांपूर्वी भारताचा विकास आणि त्यामध्ये असणारा सर्वसामान्य माणूस यांच्या दृष्टिकोनातून होणारे राजकारण यावर त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली आहे. त्यावरुन त्या मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाल्या होत्या. आपल्या भूमिकेसाठी जेवढे पैसे कलाकार आकारतात तेवढी कमाई त्यांच्या चित्रपटातून होते का असा प्रश्न शहा यांनी केला आहे. हल्ली कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यात ते अव्वाच्या सव्वा मानधन घेतात. पण तेवढी कमाई चित्रपट करतो का असा प्रश्न पडतो.

यावेळी रत्ना पाठक शहा यांनी बॉलीवूडमधील मानधन, पैशांची देवाण घेवाण याविषयी वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ भारतीय चित्रपट विश्वामध्ये आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या रत्ना पाठक शहा यांच्या त्या प्रतिक्रियेमुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

मी अनेक कलाकारांसोबत काम केले. मात्र आताच्या बॉलीवूडच्या व्यवसायाच्या परिभाषा बदलल्यानं त्याचा त्या कलाकारांवर मोठा परिणाम झाल्याचे माझे मत आहे. काही कलाकारांनी बॉलीवू़डला नेहमीच कमी लेखले आहे. असेही शहा यांनी सांगितले आहे.