esakal | 'अण्णा नाईक' यांनी घेतली उदयनराजे भोसलेंची भेट
sakal

बोलून बातमी शोधा

madhav abhyankar meets mp Udayanraje Bhosle

'अण्णा नाईक' उदयनराजे भोसलेंच्या भेटीला

sakal_logo
By
स्वाती वेमूल

'रात्रीस खेळ चाले' Ratris Khel Chale या मालिकेत अण्णा नाईकांची भूमिका साकारणारे अभिनेते माधव अभ्यंकर Madhav Abhyankar यांनी खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosle यांची भेट घेतली. साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस याठिकाणी अभ्यंकर यांनी ही सदिच्छा भेट घेतली. उदयनराजे हे 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अण्णा नाईकांच्या तोंडी असलेल्या संवादाचे खूप चाहते आहेत. त्यांनी अनेकदा त्यांच्या मुलाखतीत 'अण्णा नाईक असो' हा डायलॉग बोलून दाखवला. या भेटीदरम्यान त्यांनी माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाचं तोंडभरून कौतुक केलं.

"मला केव्हापासून महाराजांना भेटण्याची इच्छा होती. पण, योग येत नव्हता. आज अचानक मित्रवर्य मेघराज राजेंची भेट झाली आणि ते म्हणाले, चला महाराजांना भेटायला जाऊ. मी म्हणालो, नको तिथे गर्दी असेल, आपण नंतर जाऊ. पण त्यांनी हट्ट केला आणि आमची भेट झाली. त्यामुळे मी आज धन्य झालो आहे," असं माधव अभ्यंकर यांनी भेटीदरम्यानं सांगितलं. "महाराजांना ‘अण्णा नाईक असो’ हा डायलॉग आवडतो हे ऐकून धन्य झालो. माझी पत्नीदेखील उदयनराजे भोसले यांची चाहती आहे. लवकरच आम्ही एकत्र महाराजांची भेट घेणार आहोत," असंदेखील ते पुढे म्हणाले.

हेही वाचा: किर्तनकार शिवलीला पाटील वादग्रस्त का ठरली?

'रात्रीस खेळ चाले ३' लवकरच..

झी मराठी वाहिनीवरील 'रात्रीस खेळ चाले' ही मालिका पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या मालिकेचा पहिला आणि दुसरा सिझन चांगलाच गाजला होता. अण्णा नाईक, शेवंता, माई, पांडू, वच्छी अशा सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं होतं. याच लोकप्रियतेमुळे आता ही मालिका तिसऱ्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

loading image
go to top