
Raveena Tandon opened about politics in industry says : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविनानं आता जो खुलासा केला आहे त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या रविनानं बॉलीवूडचे खरे सत्य काय हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)
मोहरामध्ये रविनानं अक्षय कुमारसोबत केलेला तो डान्स यामुळे रविनाला जी लोकप्रियता मिळाली ती अजूनही कायम आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि रविना यांच्यातील नात्यावरुनही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा ही सुरुच असते. असंही म्हटले जाते की, रविना आणि अक्षय कुमारचा साखरपुडाही होणार होता मात्र काही कारणास्तव तो मोडला. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये हे दोन्ही सेलिब्रेटी एकत्र आले होते.
Also Read - नांव Fire - पण पुढचं आयुष्य 'थंडा थंडा, कूल कूल'
रविनानं एका मुलाखतीमध्ये तिची परखड भूमिका मांडली आहे. रविना म्हणते की, बॉलीवूडमध्ये माझ्यासोबत राजकारण झाले आहे. त्याचा फटका मला बसला. त्या राजकारणामुळे मला नेहमीच दुय्यम भूमिका किंवा माझ्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीच्या नावाचा विचार करण्यात आला. असेही रविनानं यावेळी सांगितले. करिश्मा कपूर वरुन तिनं काही गोष्टी सांगितल्या आहेत.
वयाची पन्नाशी पार केली असली तरी रविनाचा फिटनेस हा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा आहे. रविनानं केवळ हिंदीच नाहीतर वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे देशपातळीवर मोठे कौतुकही झाले आहे.तिला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानं देखील गौरविण्यात आले आहे. अशावेळी रविनानं बॉलीवूडमध्ये होणाऱ्या भेदभावावर बोट ठेवले आहे.
रविना म्हणते मला देखील बॉलीवूडमध्ये मोठ्या भेदभावाला सामोरं जावं लागलं. काही बड्या मंडळींनी माझ्यासोबत राजकारण केलं. अमर उजालानं दिलेल्या एका सविस्तर वृत्तामध्ये रविनानं केलेल्या खुलाशाविषयी सांगितलं आहे. काही भूमिकांमध्ये चूक झाली म्हणून त्या भूमिका कशाप्रकारे तब्बू आणि करिश्मा कपूर यांना गेल्या हे तिनं सांगितले. मी फार लवकर एखाद्या स्पर्धेवर विश्वास ठेवला. त्यातून बाहेरही पडले.
मी इतरांसारखी कट्टर नाही. माझ्याकडे पाहून कुणी असे म्हणू शकत नाही की, रविनामुळे आम्हाला त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले. मी कधीही नवीन कलाकारांसोबत अनादरानं वागलेही नाही. स्वत कधीही राजकारण केलं नाही. पण माझ्याबाबत ते झालं एवढं मात्र खात्रीनं सांगू शकते. तुम्हाला खोटं वाटेल मला साजन चले ससुराल आणि विजयपथ यांच्यासाठी साईन केलं गेलं होतं. मात्र हे दोन्ही चित्रपट माझ्याकडून गेले.